
Royal Enfield भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड वाढवण्यासाठी Royal Enfield 250cc Bike आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही नवीन 250cc Motorcycle रेंज कमी बजेटमधील कस्टमर्सना डोळ्यासमोर ठेवून विकसित केली जात आहे. सध्या कंपनीकडे हंटर 350, क्लासिक 350 आणि हिमालयन 450 सारख्या बाईक्स आहेत. पण 350cc बाइक खरेदी करणे ज्यांना परवडत नाही, अशा तरुणांसाठी ही नवीन रेंज चांगली संधी ठरू शकते.
नवीन 250cc प्लॅटफॉर्मवर काम सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल एनफिल्ड एका नवीन 250cc प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या डिझाइन आणि बॉडी स्टाइलच्या बाईक्स विकसित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नवीन मॉडेलसाठी वेगळे इंजिन आणि चेसिस तयार करण्याची गरज भासणार नाही. या बाईक्स FY2027-28 च्या उत्तरार्धात म्हणजेच 2028 च्या सुरुवातीच्या काळात येण्याची शक्यता आहे.
या प्रोजेक्टसाठी ‘V’ नावाच्या प्लॅटफॉर्मची चर्चा आहे. तसेच चीनमधील CFMoto कंपनीसोबत टेक्नोलॉजी पार्टनरशिप होण्याची शक्यताही सांगितली जात आहे. पण रॉयल एनफिल्डने या दोन्ही गोष्टींबाबत कोणतीही ऑफीशियल माहिती दिलेली नाही.
हायब्रीड टेक्नोलॉजी आणि 45 kmpl मायलेज?
या नवीन बाईक्समध्ये हायब्रीड टेक्नोलॉजी मिळण्याची चर्चा सुरू आहे. यामुळे पेट्रोलची बचत होऊन रोजच्या प्रवासाचा खर्चही कमी होऊ शकतो. काही रिपोर्ट्सनुसार, या बाईक्सचे मायलेज 40 ते 45 kmpl पर्यंत असू शकते. पण इंजिनची रचना, पॉवर, टॉर्क आणि हायब्रीड सिस्टीमबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. त्यामुळे हे आकडे सध्या अंदाज म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.
किंमत 1.25 लाख रुपयांपासून सुरू होणार?
नवीन 250cc बाईक्सची सुरुवातीची किंमत 1.25 लाख ते 1.50 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. यामुळे कमी बजेटमध्ये रॉयल एनफिल्ड खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना नवीन ऑप्शन मिळू शकतो.
भारतात 250cc ते 800cc मोटरसायकल सेगमेंटची विक्री FY2026 मध्ये 12.7 लाख युनिट्सच्या पुढे गेली. तसेच एप्रिल ते ऑक्टोबर 2026 दरम्यान 200-250cc बाईक्सची विक्री 75% वाढून 1,91,126 युनिट्स झाली. त्यामुळे या वाढत्या मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डची नवीन 250cc रेंज किती यशस्वी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.