Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडीखाली ऑईलचे डाग दिसतायत? जाणून घ्या बाईकमधून ऑईल लीक होण्याची ५ मुख्य कारणे

बाईकच्या इंजिनमधून ऑईल गळती होण्यामागे खराब झालेले गॅसकेट, झिजलेले ऑईल सील, लूज ड्रेन बोल्ट किंवा गरजेपेक्षा जास्त ऑईल भरणे ही मुख्य कारणे असतात. गाडीखाली ऑईलचे डाग दिसल्यास त्वरित मेकॅनिककडून दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा इंजिन जाम होऊन मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 13, 2026 | 10:05 PM
गाडीखाली ऑईलचे डाग दिसतायत? जाणून घ्या बाईकमधून ऑईल लीक होण्याची ५ मुख्य कारणे
Follow Us
Follow Us:

दुचाकी धारकांसाठी बाईकच्या इंजिनमधून किंवा खालच्या भागातून ऑईल लीक होणे ही एक मोठी डोकेदुखी असते. इंजिन ऑईल हे गाडीच्या इंजिनसाठी रक्तासारखे काम करते. त्यामुळे जर ऑईल सतत लीक होत राहिल्यास इंजिन जाम होण्याचा किंवा खराब होण्याचा मोठा धोका असतो. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण ही समस्या वेळेत शोधणे गरजेचे आहे. बाईकमधून ऑईल गळती होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

१. गॅसकेट खराब होणे

इंजिनचे वेगवेगळे भाग जोडताना त्यामधील जोडणी घट्ट राहण्यासाठी आणि ऑईल बाहेर पडू नये म्हणून ‘गॅसकेट’ एक प्रकारचे सील वापरले जाते. इंजिनच्या सततच्या उष्णतेमुळे आणि जुने झाल्यामुळे हे गॅसकेट कडक होते, त्याला तडे जातात किंवा ते फाटते. विशेषतः क्लच कव्हर, मॅग्नेटो कव्हर किंवा इंजिन हेडच्या गॅसकेटमधून ऑईल गळती जास्त प्रमाणात होते.

बाईकची बॅटरी वारंवार उतरतेय? दोष बॅटरीचा नाही, तर ‘मॅग्नेटो कोळशाचा’ असू शकतो! समजून घ्या

२. ऑईल सील निकामी होणे

गाडीच्या गियर शाफ्ट, किक शाफ्ट आणि स्प्रॉकेटच्या बाजूला रबराचे छोटे ‘ऑईल सील’ बसवलेले असतात. गाडी चालताना या फिरणाऱ्या भागांमुळे आणि घर्षणामुळे ऑईल सीलची झीज होते. रबर कडक झाल्याने किंवा फाटल्याने गियर लिव्हर किंवा किकच्या बाजूने ऑईल हळूहळू खाली थिपकू लागते.

३. ड्रेन प्लग लूज किंवा खराब असणे

इंजिनच्या अगदी तळाशी जुने ऑईल बाहेर काढण्यासाठी एक ‘ड्रेन बोल्ड’ किंवा प्लग दिलेला असतो. ऑईल बदलताना जर मेकॅनिकने हा बोल्ट व्यवस्थित घट्ट केला नाही, किंवा त्यामधील ॲल्युमिनियमची छोटी वॉशर बदलली नाही, तर तिथून सतत ऑईल गळती होत राहते. काही वेळा बोल्टची थ्रेड खराब झाल्यामुळेही हा त्रास होतो.

गाडी चालवताना बॅटरी नेमकी कशी चार्ज होते? जाणून घ्या सोप्या भाषेत

४. अतिप्रमाणात इंजिन ऑईल भरणे

प्रत्येक बाईकच्या इंजिनची ऑईल साठवण्याची एक निश्चित क्षमता असते (उदा. ९०० मिली किंवा १ लिटर). जर गाडीत क्षमतेपेक्षा जास्त ऑईल भरले, तर इंजिनच्या आत अतिप्रमाणात दबाव निर्माण होतो. हा अतिरिक्त दबाव कमी करण्यासाठी ऑईल इंजिनच्या ब्रीदर पाईपमधून किंवा कमकुवत सीलमधून बाहेर पडू लागते.

५. इंजिन केसिंगला तडे जाणे

हा प्रकार सहसा खराब रस्त्यांवर किंवा अपघातामुळे घडतो. गाडी चालवताना खाली असलेला मोठा दगड किंवा स्पीड ब्रेकर इंजिनच्या खालच्या भागाला जोरात आदळल्यास इंजिनच्या ॲल्युमिनियम केसिंगला लहान तडे जातात, ज्यामधून ऑईल सतत गळत राहते.

महत्त्वाचे:बाईक पार्क केल्यानंतर खाली ऑईलचे थेंब दिसल्यास त्वरित मेकॅनिककडे जाऊन तपासणी करा. वेळीच लहान सील किंवा गॅसकेट बदलल्यास इंजिनचा मोठा खर्च वाचू शकतो.

Web Title: Car bike oil leakage problem reasons automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • cars

संबंधित बातम्या

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या
1

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या

कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या
2

कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या

गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे
3

गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे

बाईकची बॅटरी वारंवार उतरतेय? दोष बॅटरीचा नाही, तर ‘मॅग्नेटो कोळशाचा’ असू शकतो! समजून घ्या
4

बाईकची बॅटरी वारंवार उतरतेय? दोष बॅटरीचा नाही, तर ‘मॅग्नेटो कोळशाचा’ असू शकतो! समजून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.