Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Buying Guide: नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा, या गोष्टी लक्षात ठेवा नाही तर रिकामा होईल खिसा

गाडी खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण गाडी खरेदी करताना आपण मोठ्या प्रमाणात खर्च करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2026 | 02:30 PM
Car Buying Guide: नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा, या गोष्टी लक्षात ठेवा नाही तर रिकामा होईल खिसा

Car Buying Guide: नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा, या गोष्टी लक्षात ठेवा नाही तर रिकामा होईल खिसा

Follow Us
Follow Us:
  • गाडी खरेदी करण्यापूर्वी आपल्या गरजा, बजेट आणि वापर लक्षात घेऊन योग्य मॉडेल निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • एक्स-शोरूम किंमतीवर न थांबता ऑन-रोड किंमत, इंश्योरेंस आणि एक्सेसरीजचा एकूण खर्च तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा.
  • गाडी घेताना प्री-डिलीवरी इंस्पेक्शन (PDI) आणि टेस्ट ड्राइव्ह करून गाडीची गुणवत्ता आणि स्थिती नीट तपासणे आवश्यक आहे.
नवीन गाडी खरेदी करणं हा एक अतिशय मोठा निर्णय असतो. कारण तुम्ही साठवलेल्या आणि मेहनतीच्या पैशांतून लाखो रुपयांची गाडी खरेदी करता. अशा परिस्थितीत जर तुम्ही कोणताही विचार न करता थेट शोरुममध्ये गेलात तर तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात, तसेच तुम्ही चुकीच्या डीलचे देखील शिकार होऊ शकता. यामुळे गाडी खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागणार आहे.

आता इंधनाचं टेन्शन नाही! भारतात 500 किमी पेक्षा जास्त रेंज असलेल्या 6 नवीन ई-कार लवकरच लॉन्च, प्रीमियम फीचर्स आणि बरेच काही…

विचार करून मॉडेल निवडा

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे केवळ दिखाव्यासाठी किंवा दुसऱ्यांचे बघून गाडी खरेदी करू नका. गाडी खरेदी करताना विचाार करा की, रोज किती प्रवास करावा लागणार आहे, तुमच्या कुटूंबात किती माणसं आहेत आणि तुम्हाला कोणत्या गाडीची गरज आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणते कार मॉडेल खरेदी करायचे आहे, याचा निर्णय घ्या. शोरुममध्ये सहसा अशा काही गोष्टी सांगितल्या जातात ज्यामुळे ग्राहक गोंधळतात आणि जास्तीचा खर्च करतात. उदाहणार्थ, मेजर सर्विसच्या नावाखाली ग्राहकांकडून जास्तीचे पैसे उकळले जातात. पण गाडी खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की, कंपनी जे सर्विस शेड्यूल देते, तेच योग्य असते. तुम्ही हे शेड्यूल फॉलो करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत

किंमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर केवळ गाडीची एक्स-शोरूम किंमत पाहून आनंदी होऊ नका. कारण ऑन-रोड किंमत समोर आल्यानंतर तुम्हाला खऱ्या खर्चाबाबत समजते. यामध्ये इंश्योरेंस, आरटीओ आणि एक्सेसरीज सारख्या अनेक वस्तूंचे चार्जेस जोडले जातात. त्यामुळे नेहमी एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत जाणून योग्य निर्णय घ्या.

इंश्योरेंस आणि गाडीच्या एक्सेसरीज

अनेकांना वाटतं की, शोरूममधून इंश्योरेंस खरेदी केल्सास आपल्याला फायदा होऊ शकतो. पण जर तुम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या इंश्योरेंसची तुलना केली तर तुम्हाला आणखी चांगला पर्याय मिळू शकतो. तसेच शोरूममध्ये मिळणाऱ्या गाडीच्या एक्सेसरीजची किंमत देखील अवाढव्य असते, ज्यामुळे तुमच्या खिशावर ताण येतो. त्यामुळे अनेक लोकं बाहेरुन गाडीच्या एक्सेसरीज खरेदी करण्यावर अधिक भर देतात, ज्यामुळे खर्च कमी होतो.

रेंजच्या बॅटरीत Tata Sierra EV सगळ्या गाडयांना मागे सोडणार? लाँच होण्याअगोदर जाणून घ्या ‘ही’ माहिती

प्री-डिलीवरी इंस्पेक्शन

गाडी खरेदी करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे PDI म्हणजेच प्री-डिलीवरी इंस्पेक्शन. याचा अर्थ असा आहे की, गाडी खरेजी करण्यापूर्वी योग्य प्रकारे तपासा. गाडीवर कोणताही स्क्रॅच, डॅमेज किंवा ओरखडा नाही ना याची खात्री करा. अनेकदा लोकं न बघता गाडीची खरेदी करताना आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट टेस्ट ड्राइव विसरु नका. टेस्ट ड्राइव केल्याशिवाय कोणतीही गाडी खरेदी करू नका.

Web Title: Car buying guide note this important tips before buying car including price model and insurance auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • auto news
  • Car
  • car care tips

संबंधित बातम्या

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज
1

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.