HSRP number plate traffic action
‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?
जिल्ह्यात एकूण ३ लाख ४० हजार वाहनांची नोंद असून त्यापैकी १ लाख ९० हजार ४०० वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवून घेतल्या नाहीत. त्यामुळे वाहनांची ओळख, सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. जिल्ह्याच्या घाटाखालील ७ तालुक्यासाठी खामगाव येथे व ६ तालुक्यासाठी बुलढाणा येथे स्वातंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. बुलढाणा कार्यालयाअंतर्गत १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत असलेल्या २ लाख ९० हजार २९१
वाहनांपैकी १ लाख २७ हजार ७२० वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसविण्यात आले. तर खामगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या ५० हजार ३१२ वाहनांपैकी २२ हजार १३७वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली. वारंवार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना करून देखील याकडे कानाडोळा करणाऱ्या वाहनधारकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
केंद्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच बनावट नंबर प्लेटला आळा घालण्यासाठी एचएसआरपी अनिवार्य केली आहे. या नंबर प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये, लेझर कोड आणि युनिक ओळख क्रमांक असल्याने वाहनांचा मागोवा वापरल्या जाणाऱ्या वाहनांची ओळख घेणे सोपे होते. अपघात, चोरी किंवा गुन्ह्यात पटविण्यासही या प्लेटचा मोठा फायदा होतो.
बुलढाण्याचे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पवन नव्हाडे म्हणाले की, १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे अनिवार्य आहे. ज्या वाहनधारकांनी अद्यापपर्यंत ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविली नाही, त्यांनी तत्काळ बसून घ्यावी. नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड






