फोटो सौजन्य: @bijoyghosh70 (X.com)
भारतात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या वेळी भेटवस्तू आणि बोनस देत असतात. जास्तकरून कंपन्या दिवाळीच्या मुहूर्तावर बोनस आणि भेटवस्तू देत असतात. काही कंपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांना असे भन्नाट गिफ्ट्स देत असतात. ज्याचे व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका चेन्नई स्थित कंपनीची चर्चा सगळीकडे होतात दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
चेन्नईस्थित टेक स्टार्टअप Agilisium Consulting नावाच्या कंपनीने त्यांच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या टीमला अशी भेट दिली की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. कंपनीने सुरुवातीपासून कंपनीशी संबंधित 25 निष्ठावंत कर्मचाऱ्यांना एक नवीन Hyundai Creta SUV भेट दिली. या सर्व कार पांढऱ्या रंगाच्या असून विशेष म्हणजे प्रत्येक एसयूव्हीच्या नंबर प्लेटवर कर्मचाऱ्याचे नाव नोंदवलेले आहे.
अॅजिलिसियमचे सीईओ राज बाबू कर्मचाऱ्यांचे आभार मानत म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद, लोकांशिवाय कोणी नेता नसतो.” त्यांनी असेही स्पष्ट केले की ही कार केवळ एक बक्षीस नाही तर ती त्यांच्या विश्वासाचे आणि टीम स्पिरिटचे प्रतीक आहे.
मेट्रोपेक्षाही स्वस्त आहे ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवरून अप-डाउन करणं, मिळेल 150 किमीची रेंज
एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून इतक्या मोठ्या संख्येने कार दिल्याची ही पहिलीच वेळ नाही. चेन्नईस्थित कंपनी टीम डिटेलिंग सोल्युशन्सने आधीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना टाटा टियागोपासून मर्सिडीज सी-क्लासपर्यंत 28 कार आणि 29 बाईक भेट दिल्या. याशिवाय, पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने त्यांच्या 15 कर्मचाऱ्यांना टाटा पंच एसयूव्ही भेट दिल्या होत्या.
भेटवस्तू दिलेल्या Hyundai Creta SUVs मध्ये कोणते इंजिन व्हेरियंट आहेत हे कंपनीने उघड केले नाही, परंतु सहसा ह्युंदाई क्रेटा तीन इंजिन ऑप्शनसह येते – 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो डिझेल आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल (TGDi). तसेच, ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीची किंमत 11.11 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते आणि 20.50 लाख रुपयांपर्यंत जाते.
जानेवारी 2024 मध्ये लाँच झालेल्या नवीन फेसलिफ्ट केलेल्या ह्युंदाई क्रेटामध्ये अनेक नवीनतम फीचर्स आहेत. यामध्ये नवीन मोठे ग्रिल, नवीन हेडलॅम्प, स्कफ प्लेट्स आणि पुन्हा डिझाइन केलेले बॉडी लाइन्स समाविष्ट आहेत. मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेल लाइट्स आणि नवीन बंपर तसेच नवीन अलॉय व्हील्स आहेत.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर Jaguar ने रद्द केला ‘हा’ मोठा इव्हेंट
इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर यात 10.25 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, अॅम्बियंट लाइटिंग, रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जिंग, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ऑनबोर्ड एअर प्युरिफायर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि रिअर सनशेड सारखी प्रगत फीचर्स आहेत.