Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅटरी भाड्याने घ्या आणि कार चालवा! सिट्रॉन e-C3X चा भारतीय बाजारात मास्टरस्ट्रोक!

सिट्रॉन e-C3X ने भारतात 'बॅटरी भाड्याने देण्याची' (BaaS) अनोखी संकल्पना आणून मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी प्रीमियम ईव्ही खरेदी अतिशय परवडणारी केली आहे. सुरुवातीची किंमत थेट ₹६.८९ लाखांपर्यंत आणणारी सिट्रॉनची ही बजेट-फ्रेंडली खेळी भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील खरा 'मास्टरस्ट्रोक' ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 18, 2026 | 03:00 PM
बॅटरी भाड्याने घ्या आणि कार चालवा! सिट्रॉन e-C3X चा भारतीय बाजारात मास्टरस्ट्रोक!
Follow Us
Follow Us:

भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्यांचा  बोलबाला वाढत असतानाच, फ्रेंच कार कंपनी सिट्रॉनने आपली नवी कोरी Citroen e-C3X इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारात उतरवली आहे. आकर्षक डिझाईन आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीत आलेली ही स्टायलिश कार सध्या ऑटोमोबाईल विश्वात धुमाकूळ घालत आहे.

दमदार फीचर्स आणि रॅडिकल लुक

सिट्रॉन e-C3X चा SUV अवतार एकदम युनिक आणि बोल्ड आहे. यात नवीन LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, स्प्लिट LED DRLs आणि १५-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारच्या आत डोकावल्यास, ‘इलेक्ट्रिक ब्लू’ थीमसह ड्युअल-टोन लेदरेट सीट्स आणि डॅशबोर्ड मिळतो. टेक-सॅव्ही लोकांसाठी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट करणारी १०.२५-इंच टचस्क्रीन आणि ७-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. सुरक्षेसाठी यात ६ एअरबॅग्ज आणि वायरलेस चार्जरचा समावेश आहे.

बॅटरीचे खास वैशिष्ट्य आणि खरेदीचा भारी पर्याय (BaaS)

या कारमध्ये २९.२ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो, जो सिंगल चार्जमध्ये तब्बल ३२५ किमी (MIDC) ची उत्तम रेंज देतो. डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ही बॅटरी अवघ्या ५७ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते. या गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे BaaS (Battery-as-a-Service) हा पर्याय! म्हणजे, ग्राहकांना गाडी खरेदी करताना बॅटरीची पूर्ण किंमत एकदम मोजावी लागणार नाही. ग्राहक बॅटरीशिवाय फक्त गाडी खरेदी करू शकतात आणि बॅटरी भाड्याने (रेंटवर) घेऊ शकतात.  सिट्रॉनचा ‘स्मार्ट’ पॅक- BaaS पर्यायांतर्गत बॅटरीचे भाडे फक्त ₹२.२६ प्रति किमी एवढेच मोजावे लागेल!

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

ग्राहकांची होणार बंपर बचत

सिट्रॉनने या पर्यायाद्वारे भारतीय ग्राहकांसाठी ईव्ही खरेदी अतिशय परवडणारी केली आहे:

कमी किंमत: बॅटरीसह या कारची किंमत ₹१०.२५ लाख (ex-showroom) पासून सुरू होते. पण BaaS पर्याय निवडल्यास, गाडी फक्त ₹६.८९ लाखांत खरेदी करता येते. यामुळे सुरुवातीचा मोठा खर्च वाचतो.

परवडणारा रनिंग कॉस्ट: पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत या गाडीचा मेंटेनन्स खर्च अवघा १९ पैसे प्रति किमी येतो, ज्यामुळे महिन्याचा खिसा हलका होत नाही.

SUV Sale: आकर्षक डिस्काउंटमुळे प्रीमियम SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या ऑफर

भारतीय रस्त्यांसाठी वरदानच जणू

भारतीय रस्त्यांवरील खड्डे आणि ट्रॅफिकचा विचार करून यात सिट्रॉनचे प्रसिद्ध Advanced Comfort Suspension दिले आहे, जे प्रवाशांना ‘फ्लाइंग कार्पेट’ प्रवास अनुभव देते. १७० मिमी चा उत्तम ग्राउंड क्लीअरन्स आणि ४.९८ मीटरचा लहान टर्निंग रेडिअस यामुळे ही कार गर्दीच्या शहरात आणि हायवेवर चालवणे अगदी सोपे जाते.

थोडक्यात सांगायचे तर, कमी बजेटमध्ये प्रीमियम आणि पर्यावरणपूरक SUV शोधणाऱ्या भारतीय कुटुंबांसाठी नवी सिट्रॉन e-C3X हा एक ‘पैसा वसूल’ आणि स्मार्ट पर्याय ठरतोय.

Web Title: Citroen e c3x electric suv available in india auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • automobile news
  • electric car
  • Electric Cars

संबंधित बातम्या

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
1

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
2

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
3

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.