नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित
Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क
वाहन निर्माता स्कोडा मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कुशाक भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करते. या गाडीच्या बेस व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत 10.69 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सुमारे 1.07 लाख रुपये आरटीओ आणि सुमारे 45 हजार रुपये इंश्योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. याशिवाय, एसयूवीवर सुमारे 11 हजार रुपयांचा टीसीएस चार्ज देखील भरावा लागणार आहे. या सर्वांनंतर स्कोडा कुशाकची ऑन-रोड किंमत सुमारे 12.31 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट खरेदी करणार असाल तर बँक तुम्हाला गाडीच्या एक्स शोरूम किंमतीवर कर्ज देणार आहे. अशावेळी, दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 10.31 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागणार आहे. जर बँकेने तुम्हाला 9 टक्क्यांच्या व्याजासह 7 वर्षांसाठी 10.31 लाख रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला दर महिन्याला 16603 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 10.31 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर 7 वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिन्याला 16603 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे, सात वर्षांत, तुम्हाला स्कोडा कुशाकच्या बेस व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 3.62 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत सुमारे 15.94 लाख रुपये होणार आहे.
TATA Sierra vs Kia Seltos: कोणती SUV देते बेस्ट माइलेज? वाचा परफॉर्मंस आणि किंमतीमधील फरक
स्कोडा कुशाक ही मिड-साईज एसयूव्ही म्हणून सादर करते. ही गाडी मारुती ग्रँड विटात्रा, टाटा हॅरियर, ह्युंदाई क्रेटा, फोक्सवॅगन टायगुन, किया सिरोस, किया सेल्टोस आणि महिंद्रा स्कॉर्पिओ यांसारख्या गाड्यांशी थेट स्पर्धा करते.






