
सिट्रोएनची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात; वाचा काय आहे खास?
तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करताय, तर थोड थांबा. कारण नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होण्यास सज्ज आहे. ही कार सिट्रोनची आहे. सिट्रोएनची आगामी नवीन इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर तब्बल 250 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. या कारची थेट स्पर्धा टाटा पंच EV शी असेल. कारचा पहिला अधिकृत टीझर समोर आला आहे, त्यामुळे Citroen येत्या आठवड्यात eC3X च्या लाँचिंगची तारीख जाहीर करू शकते.
फ्रेंच कार कंपनी सिट्रोएन लवकरच भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनीने आगामी इलेक्ट्रिक कारचा टीझर शेअर केला आहे. आगामी नवीन इलेक्ट्रिक कार eC3 ची अद्ययावत आवृत्ती आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कारमधील डिझाइन आणि फीचर्स अपडेट केले जातील तसेच तिचे नावही बदलेल. या कारचे नाव आता eC3 X असेल.
टीझर प्रतिमेवरून असे दिसून आले आहे की अपडेटेड eC3X मध्ये सिल्व्हर स्किड-प्लेटसारखे इन्सर्ट, एलईडी डे-टाइम रनिंग लॅम्प आणि एलईडी फॉग लॅम्प्ससह एक नवीन फ्रंट बम्पर मिळतो. इतर व्हिज्युअल अपग्रेडमध्ये रिअरव्ह्यू मिररचा नवीन संच आणि समाकलित टर्न इंडिकेटर्ससह ड्युअल-टोन अलॉय व्हील्सचा समावेश आहे.
डिझाइनमध्ये बदल करण्याव्यतिरिक्त, Citroen आपल्या नवीन कार eC3X मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स जोडणार आहे. कारच्या आतील डिझाइनमध्ये बदल केला जाईल. तसेच, आराम आणि सुरक्षा सुधारण्यासाठी काही प्रीमियम गोष्टी जोडल्या जातील. या नवीन फीचर्सच्या मदतीने eC3X कार बाजारात इतर स्वस्त इलेक्ट्रिक कारला चांगली स्पर्धा देऊ शकेल.
जरी कारचे डिझाइन आणि वैशिष्ट्ये बदलली जात असली तरी तिची इलेक्ट्रिक पॉवरट्रेन जुन्या eC3 कारसारखीच राहील. यात 29.2 kWh ची बॅटरी मिळेल. हे 56 bhp पॉवर आणि 143 Nm टॉर्क जनरेट करेल. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा फुल चार्ज झाल्यावर सुमारे 250 किलोमीटर धावेल.