
या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचे वर्चस्व कायम आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये 73,621 CNG कार डिस्पॅच केल्या, तर ऑगस्ट 2025 मध्ये हा आकडा 52,214 होता. त्यामुळे कंपनीने 41% वाढ नोंदवली असून CNG मार्केटमध्ये तिचा वाटा तब्बल 69.9% राहिला. मारुती सुझुकी अर्टिगा 13,352 युनिट्ससह कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी CNG कार ठरली. पण तिच्या विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 1% घट झाली.
टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना
मारुती सुझुकी डिझायरची 12,963 युनिट्सची विक्री झाली असून, तिच्या विक्रीत 26% वाढ झाली. वॅगन आरच्या 9,405 आणि ब्रेझाच्या 7,608 CNG युनिट्सची विक्री झाली. नव्या मारुती सुझुकी व्हिक्टोरिसनेही 6,833 युनिट्सची नोंद करत टॉप 10मध्ये स्थान मिळवले.
टाटा मोटर्सने या कालावधीत सर्वात वेगवान वाढ नोंदवली. कंपनीची CNG विक्री 10,805 वरून वाढून 18,438 युनिट्सवर पोहोचली, म्हणजे 70.6% वाढ. यामध्ये टाटा पंचचा मोठा वाटा राहिला. पंच CNGच्या 7,767 युनिट्स विकल्या गेल्या, ज्या ऑगस्ट 2025 मधील 3,838 युनिट्सपेक्षा तब्बल 102% जास्त आहेत. टाटा नेक्सॉनचीही 6,178 युनिट्सची विक्री झाली.
ह्युंदाईने ऑगस्टमध्ये 10,622 CNG कार डिस्पॅच केल्या. ऑरा 6,485 युनिट्ससह कंपनीची प्रमुख CNG कार ठरली. टोयोटाने 2,568 CNG कार विकल्या असून तिच्या विक्रीत 39.4% वाढ झाली.
विशेष म्हणजे CNGचा पर्याय आता केवळ हॅचबॅक किंवा MPVपुरता लिमिटेड राहिलेला नाही. पंच, ब्रेझा, नेक्सॉन, व्हिक्टोरिस आणि फ्रॉन्क्ससारख्या SUV आणि क्रॉसओव्हरमध्येही CNG पर्याय मिळत असल्याने कस्टमर्ससमोर निवडीचे पर्याय वाढले आहेत. ऑगस्टची आकडेवारी पाहता CNG कारचा मार्केट विस्तारण्याचा ट्रेंड पुढेही कायम राहण्याची शक्यता दिसते.