Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायरवरील आकड्यांचे रहस्य! सुरक्षेसाठी आणि चांगल्या मायलेजसाठी योग्य टायर कसा ओळखावा? जाणून घ्या योग्य टायर निवडण्याचे गणित

टायरवरील '195/55 R16 87V' सारखे कोडिंग त्याची रुंदी, उंची, स्पीड रेटिंग आणि वजन पेलण्याची क्षमता दर्शवते. गाडीची सुरक्षा आणि मायलेज टिकवून ठेवण्यासाठी कंपनीने शिफारस केलेल्या योग्य आकाराचा आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट तपासूनच नवीन टायर निवडावा.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 21, 2026 | 06:33 PM
टायरवरील आकड्यांचे रहस्य! सुरक्षेसाठी आणि चांगल्या मायलेजसाठी योग्य टायर कसा ओळखावा? जाणून घ्या योग्य टायर निवडण्याचे गणित
Follow Us
Follow Us:

गाडीचे इंजिन कितीही शक्तिशाली असले, तरी रस्त्याशी थेट संपर्क फक्त टायरचा असतो. आपण अनेकदा टायर बदलताना फक्त ब्रँड किंवा किंमत बघतो, पण टायरच्या बाजूला 195/55 R16 87V सारखे काही गुढ आकडे आणि अक्षरे लिहिलेली असतात. या कोडिंगमध्येच तुमच्या गाडीची सुरक्षा, मायलेज आणि परफॉर्मन्स लपलेला असतो. या आकड्यांचा सोप्या भाषेत अर्थ काय, हे आपण सविस्तर समजून घेऊया,

‘195/55 R16 87V’ चा सोपा अर्थ काय?

चला या कोडला एका एका भागात मोडून समजूया-

195 (टायरची रुंदी – Width): हे पहिले तीन आकडे टायरची एकूण रुंदी मिलिमीटर  मध्ये दर्शवतात. म्हणजेच हा टायर १९५ मिमी रुंद आहे. टायर जेवढा रुंद, तेवढी रस्त्यावरील पकड (Grip) चांगली, पण मायलेज थोडे कमी होते.

55 (अस्पेक्ट रेशो – Aspect Ratio): हा आकडा टायरच्या रुंदीच्या तुलनेत त्याची उंची टक्केवारीत दर्शवतो. येथे ५५ चा अर्थ असा की टायरची उंची त्याच्या १९५ मिमी रुंदीच्या ५५% आहे. हा आकडा कमी असल्यास गाडी स्पोर्ट्स कारसारखी दिसते, पण खड्ड्यांमध्ये जास्त धक्के बसतात.

सिट्रोएन इंडियाने सादर केली नवी ë-C3X; BaaS पर्यायामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी झाली अधिक परवडणारी

R (रचना): ‘R’ चा अर्थ Radial (रेडिअल) असा आहे. आजकालच्या बहुतांश सर्वच गाड्यांमध्ये रेडिअल टायर्सचाच वापर केला जातो, जे दीर्घायुष्य आणि चांगल्या मायलेजसाठी सर्वोत्तम मानले जातात.

16 (रिमचा आकार – Rim Diameter): हा आकडा इंचा मध्ये असतो. याचा अर्थ हा टायर १६ इंचाच्या व्हील रिम (Wheel Rim/Alloy) वर बसेल.

87 (लोड इंडेक्स – Load Index): हा आकडा एक कोड आहे, जो हा टायर जास्तीत जास्त किती वजन पेलू शकतो हे दर्शवतो. ‘८७’ या कोडचा अर्थ असा की हा एक सिंगल टायर ५४५ किलोग्रॅम पर्यंतचे वजन सुरक्षितपणे पेलू शकतो.

V (स्पीड रेटिंग – Speed Rating): हे अक्षर हा टायर जास्तीत जास्त किती गतीने धावू शकतो याची क्षमता दर्शवते. ‘V’ रेटिंगचा अर्थ असा की या टायरवर गाडी जास्तीत जास्त २४० किमी/तास या वेगाने सुरक्षितपणे चालवली जाऊ शकते.

Car Discount : कार खरेदीची सुवर्णसंधी! सिट्रोएन कारवर बंपर ऑफर, 1.4 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सूट

तुमच्या सुरक्षेसाठी आणि मायलेजसाठी योग्य टायर कसा ओळखावा?

चुकीचा टायर निवडल्यास गाडीचे मायलेज घसरू शकते आणि सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. नवीन टायर घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

१. उत्पादकाची शिफारस (OEM Specs) नेहमी पाळा

तुमच्या गाडीच्या मॅन्युअल बुकवर किंवा ड्रायव्हर सीटच्या दरवाजाच्या चौकटीवर एक स्टिकर असते, ज्यावर योग्य टायर साईझ लिहिलेली असते. कंपनीने दिलेल्या साईझचेच टायर्स वापरणे मायलेज आणि इंजिनच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम असते.

२. टायरची रुंदी (Width) आणि मायलेजचा संबंध

जर तुम्ही कंपनीने दिलेल्या साईझपेक्षा जास्त रुंद (Wider) टायर बसवले, तर रस्त्याशी घर्षण वाढते. यामुळे गाडीला ग्रिप तर चांगली मिळते, पण गाडीचे मायलेज ५ ते १० टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि स्टेअरिंग थोडे जड लागते.

३. मॅन्युफॅक्चरिंग डेट (DOT Code) नक्की तपासा

टायरवर ४ अंकी एक कोड असतो (उदा. 2426). याचा अर्थ हा टायर २०२६ च्या २४ व्या आठवड्यात बनवला गेला आहे. टायर दिसायला अगदी नवीन असला, तरी ३ वर्षांपेक्षा जुना असलेला टायर कधीही खरेदी करू नका; कारण जुन्या रबराची पकड कमकुवत होते.

जर तुम्ही महामार्गावर जास्त प्रवास करत असाल, तर नेहमी ‘H’ (२१० किमी/तास) किंवा ‘V’ (२४० किमी/तास) सारखे उच्च स्पीड रेटिंग असलेले टायर्स निवडा. हे टायर्स वेगात धावताना निर्माण होणारी उष्णता चांगल्या प्रकारे सहन करू शकतात आणि टायर फुटण्याचा (Tyre Burst) धोका टळतो.

 

Web Title: Code numbers on tyres of vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
1

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
2

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
3

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
4

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.