Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! पेट्रोल बाईक बंद होणार? देशातील ‘या’ भागात धावणार फक्त इलेक्ट्रिक गाड्याच; कधीपासून लागू होणार नियम?

दिल्लीत 2028 पासून पेट्रोल आणि डिझेल दुचाकींच्या नोंदणीवर बंदी येण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारच्या नवीन ईव्ही धोरणानुसार शहराला इलेक्ट्रिक व्हेईकल हब बनवण्याची तयारी सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 10, 2026 | 05:17 PM
काय सांगता! पेट्रोल बाईक बंद होणार? देशातील ‘या’ भागात धावणार फक्त इलेक्ट्रिक गाड्याच; कधीपासून लागू होणार नियम?
Follow Us
Follow Us:

 

  • काय सांगता! पेट्रोल बाईक बंद होणार?
  • देशातील ‘या’ भागात धावणार फक्त इलेक्ट्रिक गाड्याच
  • कधीपासून लागू होणार नियम?
नवी दिल्ली: देशाची राजधानी आता प्रदूषणातून मुक्ती मिळवण्यासाठी एका ऐतिहासिक निर्णयाच्या उंबरठ्यावर आहे. दिल्ली सरकारच्या नवीन ‘EV Policy 2.0’ च्या मसुद्यानुसार, 2028 पासून शहरात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या नवीन दुचाकींच्या नोंदणीवर (Registration) पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दिल्लीला देशाची ‘EV Capital’ बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे.

2028 पासून फक्त इलेक्ट्रिक दुचाकींनाच परवानगी

दिल्ली सरकारने तयार केलेल्या नवीन धोरणानुसार, 1 April 2028 पासून शहरात केवळ इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या नोंदणीला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, या तारखेनंतर दिल्लीत नवीन पेट्रोल बाईक किंवा स्कूटर खरेदी करून त्यांची अधिकृत नोंदणी करता येणार नाही. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर पेट्रोल गाड्यांवर इतकी मोठी बंदी घालणारे दिल्ली हे देशातील पहिले शहर ठरेल.

थ्री-व्हीलरबाबतही कठोर पावले

दुचाकींसोबतच सार्वजनिक वाहतुकीवरही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. 2027 पासून पेट्रोल, डिझेल आणि CNG वर चालणाऱ्या नवीन थ्री-व्हीलरची नोंदणी बंद करण्याचा प्रस्ताव या मसुद्यात आहे. यानंतर केवळ इलेक्ट्रिक ऑटो आणि इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरनाच रस्त्यावर उतरण्याची परवानगी असेल. तसेच, जुन्या CNG रिक्षांना इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजनाही आखली जात आहे.

Auto Care: घराबाहेर उभी असलेली कार होऊ शकते भंगार; इंजिन आणि बॅटरी वाचवण्यासाठी आजच करा ‘हे’ काम

प्रदूषणावर मात करण्यासाठी मोठा निर्णय

गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीची हवा आणि खराब गुणवत्ता हा राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरला आहे. वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन हे हवेच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. सरकारचा असा विश्वास आहे की, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होईल. EV Policy 2.0 हे याच दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.

ग्राहकांसाठी आकर्षक सबसिडी आणि सवलती

केवळ बंदी घालून न थांबता, सरकार नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्यासाठी आर्थिक मदतीचा हातही देणार आहे.

  • Subsidies: इलेक्ट्रिक दुचाकींच्या खरेदीवर आकर्षक सबसिडी दिली जाणार आहे.
  • महिलांना विशेष सवलत: महिला खरेदीदारांना अतिरिक्त फायदे देण्याबाबत सरकार विचार करत आहे.
  • Scrappage Bonus: जुनी पेट्रोल-डिझेल वाहने भंगारात काढून EV घेतल्यास विशेष बोनस दिला जाण्याची शक्यता आहे.

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर भर

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुलभ व्हावा यासाठी दिल्ली सरकार संपूर्ण शहरात चार्जिंग पॉईंट्स आणि ‘Battery Swapping’ स्टेशन्सचे जाळे विणणार आहे. हजारो नवीन चार्जिंग पॉईंट्स उभारण्याचा प्रस्ताव मसुद्यात असून, यामुळे चालकांना रेंजची चिंता राहणार नाही, याची खात्री सरकार देणार आहे.

सुरक्षेचा अभावच ! ‘या’ प्रसिद्ध कार क्रॅश टेस्टमध्ये झाल्या फेल; कौटुंबिक सुरक्षा येऊ शकते धोक्यात

Web Title: Delhi ev policy 2 petrol bike registration ban 2028 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • auto news
  • delhi

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
3

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
4

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.