तुमची गाडी कित्येक दिवस उभी असते का? हे महागात पडू शकते, कारण त्यामुळे बॅटरीपासून इंजिनपर्यंत सर्व गोष्टींचे गंभीर नुकसान होऊ शकते ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Car maintenance tips for idle cars : आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे, विशेषतः ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे अनेक लोकांच्या गाड्या घराबाहेर किंवा पार्किंगमध्ये कित्येक दिवस उभ्या असतात (car care tips) . आपल्याला वाटते की गाडी वापरली नाही म्हणजे ती सुरक्षित आहे आणि तिची झीज होणार नाही. परंतु, वाहन तज्ञांच्या मते ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. उलट, गाडी चालवण्यापेक्षा ती जास्त काळ उभी राहिल्याने तिचे अधिक गंभीर नुकसान होते. गंज चढण्यापासून ते बॅटरी निकामी होण्यापर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.
आधुनिक गाड्यांमध्ये अनेक अद्ययावत इलेक्ट्रॉनिक प्रणाली असतात. गाडी बंद असतानाही घड्याळ, अलार्म सिस्टीम आणि सेन्सर्सना थोड्या प्रमाणात विजेची गरज असते. जर गाडी आठवडाभर सुरू केली नाही, तर बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होते. दीर्घकाळ डिस्चार्ज अवस्थेत राहिल्याने बॅटरीची क्षमता कायमची संपते आणि तुम्हाला नवीन बॅटरी घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी इंजिन १५-२० मिनिटे सुरू ठेवणे आवश्यक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार
गाडी एकाच ठिकाणी उभी असल्याने टायरच्या ज्या भागावर जमिनीचा स्पर्श होतो, त्यावर पूर्ण गाडीचा भार पडतो. यामुळे टायरमध्ये ‘फ्लॅट स्पॉट्स’ तयार होतात. परिणामी, जेव्हा तुम्ही गाडी रस्त्यावर काढता, तेव्हा ती थरथरू लागते किंवा कंपने जाणवतात. तसेच, इंजिनमध्ये असलेले ऑईल कालांतराने खाली बसते, ज्यामुळे इंजिनचे वरचे भाग कोरडे पडतात. जेव्हा तुम्ही दीर्घकाळाने गाडी सुरू करता, तेव्हा घर्षणामुळे इंजिनला अंतर्गत इजा होऊ शकते. याव्यतिरिक्त, इंधन टाकीत असलेले पेट्रोल किंवा डिझेल शिळे झाल्यामुळे त्याची ज्वलन क्षमता कमी होते, ज्याचा थेट परिणाम इंजिनच्या परफॉर्मन्सवर होतो.
पावसाळी किंवा दमट हवामानात जर गाडी उभी राहिली, तर ब्रेक डिस्कवर गंज चढण्यास सुरुवात होते. यामुळे ब्रेक लावताना आवाज येणे किंवा ब्रेक जाम होणे अशा समस्या निर्माण होतात. तसेच, झाडाखाली किंवा उघड्यावर गाडी उभी असल्यास पक्षांची विष्ठा, ऊन आणि धूळ यामुळे गाडीच्या पेंटची चमक कमी होते. उंदीर किंवा इतर कीटक गाडीच्या वायर कापण्याची शक्यताही उभी असलेल्या गाड्यांमध्ये जास्त असते, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार
तुमची गाडी सुस्थितीत ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. जर तुमची गाडी जास्त वापरली जात नसेल, तर आठवड्यातून किमान दोनदा ती ५ ते १० किलोमीटर चालवा. यामुळे बॅटरी चार्ज होईल, इंजिन ऑईल सर्व भागांपर्यंत पोहोचेल आणि टायरचा आकारही व्यवस्थित राहील. जर महिनाभर गाडी वापरणार नसाल, तर बॅटरीचे टर्मिनल काढून ठेवा आणि इंधन टाकी पूर्ण भरून ठेवा जेणेकरून त्यात ओलावा (Moisture) जमा होणार नाही. गाडीवर नेहमी चांगल्या दर्जाचे कव्हर वापरा आणि शक्य असल्यास टायर्समध्ये नायट्रोजन हवा भरा, ज्यामुळे हवेचा दाब बराच काळ टिकून राहतो.






