फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची गाडी असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जेव्हा आपण एखादे वाहन खरेदी करतो तेव्हा त्याला मेंटेन करणे सुद्धा महत्वाचे आहे. यातही वेळेवर बाईक किंवा कारचे इंजिन ऑइल बदलणे तर खूप महत्वाचे आहे. असे न केल्यास याचा परिणाम बाईक किंवा कारच्या परफॉर्मन्सवर होतो. यामुळे काही वेळेस तर कार मालकांना हजारांचा चुना सुद्धा लागतो.
जरी तुम्ही कोणतेही वाहन चालवत असाल तरी तुम्हाला त्याच्या इंजिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजिन ऑइलची माहिती असणे आवश्यक आहे. हे केवळ इंजिनच्या पार्ट्सना जास्त गरम होऊ देत नाही. हे कारचे इंजिन जास्त काळ टिकण्यास देखील मदत करते. पण इतर गोष्टींप्रमाणे इंजिन ऑइल देखील एक्सपायर होते का? असा प्रश्न काही लोकांकडून विचारला जातो. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासोबतच इंजिन ऑइल कधी बदलणे आवश्यक आहे आणि ते न बदलल्यास कोणते नुकसान होऊ शकते याबद्दलही माहिती घेऊया.
Kia Syros Vs Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या एसयूव्हीचा पगडा भारी
खरंतर अनेकांना हे माहित नसेल की इंजिन ऑइलचे देखील एक ठराविक आयुष्य असते. इंजिन ऑइल देखील एका ठराविक कालावधीनंतर कालबाह्य म्हणजेच एक्सपायर होतात. इंजिन ऑइलचे आयुष्य 2 ते 5 वर्षांपर्यंत असते. यापेक्षा त्याला जास्त वापरु नये, अन्यथा त्याचा इंजिनवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी, जेव्हा तुम्ही इंजिन ऑइल बदलत असाल आणि नवीन इंजिन ऑइल भरत असाल, तेव्हा त्या काळात त्याचे उत्पादन आणि एक्सपायरी डेट नक्कीच तपासा. अशावेळी, खूप जुने ऑइल खरेदी करणे टाळा. तज्ञांच्या मते, दर 5,000 ते 7,500 किलोमीटर अंतरावर वाहनाचे इंजिन ऑइल बदलले गेले पाहिजे. परंतु, हे वाहन मॉडेल आणि ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
वाहनाचे इंजिन ऑइल कधी बदलावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. इंजिन ऑइलची ही स्थिती जाणून घेण्यासाठी, तुम्हाला काही माहिती शोधावी लागेल. यासाठी, तुम्हाला इंजिनमधून थोडे ऑइल काढावे लागेल. जर तुम्हाला ते हलक्या रंगाऐवजी काळे दिसले आणि त्यातून दुर्गंधी येत असेल तर समजून जावा की तुमच्या गाडीचे इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली आहे. त्याच वेळी, जर गाडीतून खूप धूर निघत असेल, तर हे देखील इंजिन ऑइल बदलण्याचे लक्षण आहे.
Maruti ची ‘ही’ कार मार्केटला कायमचा ठोकणार राम राम ! स्टॉक संपवण्यासाठी कंपनी देतेय डिस्काउंट
जर इंजिन ऑइल योग्य वेळी बदलले नाही तर त्याचा इंजिनवर वाईट परिणाम होऊ शकतो. खराब ऑइलमुळे इंजिनमध्ये घर्षण वाढते, ज्यामुळे इंजिनचे पार्ट्स गरम होतात. यामुळे इंजिनमधील कूलिंगवर दाब वाढतो. यामुळे इंजिनच्या पार्ट्सचे लाइफ कमी होऊ शकते. जुने ऑइल जास्त काळ वापरल्याने संपूर्ण इंजिन सिस्टीम खराब होऊ शकते, ज्याच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला हजारो रुपयांचा खर्च येऊ शकतो.