फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये फोर मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये खूप स्पर्धा आहे. या सेगमेंटमध्ये, जवळजवळ सर्व कंपन्या उत्कृष्ट कार ऑफर करतात. या सेगमेंटमध्ये किआ सायरोस मागच्याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आली आहे. जी महिंद्रा XUV 3XO SUV शी थेट स्पर्धा करते. दोन्ही एसयूव्हीमध्ये कोणती कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
कंपनीने किया सायरोसमध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहेत. यात एक लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 120 पीएस पॉवर आणि 172 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. याशिवाय, यात 1.5 लिटर डिझेल इंजिन देखील आहे जे या कारला 116 पीएसची पॉवर आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. दोन्हीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय आहेत.
Maruti ची ‘ही’ कार मार्केटला कायमचा ठोकणार राम राम ! स्टॉक संपवण्यासाठी कंपनी देतेय डिस्काउंट
तर महिंद्रा XUV 3XO मध्ये 1.2 लिटर तीन सिलेंडर टर्बो आणि तीन सिलेंडर टर्बो TGDI इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. या कारचे नियमित 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 111 हॉर्सपॉवर आणि 200 न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करते. त्याचे 1.2 लिटर टर्बो TGDI इंजिन 131 हॉर्सपॉवर आणि 230 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.
किआने सायरोस एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिली आहेत. यात 30-इंचाचा ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनल आहे. ज्यामध्ये कनेक्टेड कार नेव्हिगेशन सिस्टम, ड्युअल पेन सनरूफ, रिअर सीट रिक्लाइन,आणि 64 रंगांचे अँबियंट लाईट्स सारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, महिंद्रा XUV 3XO मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, अलेक्सा बिल्ट-इन, व्हेईकल स्टेटस मॉनिटरिंग आणि इन-होम अलेक्सा, ADRENOX कनेक्ट, लेव्हल-2 ADAS, Harman Kardon Audio सिस्टम, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशी अनेक फीचर्स आहेत.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आता होईल अधिकच स्वस्त, त्यातही कंपनीकडून मिळतेय डिस्काउंट
किआ सायरोसमध्ये लेव्हल-2 एडीएएससह 15 ऑटोनॉमस सेफ्टी फीचर्स आहेत. याशिवाय, OTA अपडेट, सहा एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल असिस्ट, पार्किंग सेन्सर, पार्किंग कॅमेरा, ISOFIX चाइल्ड अँकरेज अशी अनेक सेफ्टी फीचर्स यात देण्यात आली आहेत.
दुसरीकडे, महिंद्रा XUV 3XO मध्ये ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, ड्राइव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग, इंटरॅक्टिव्ह पार्किंग मार्गदर्शन, ट्रिप समरी, रिमोट व्हेईकल कंट्रोल, स्टँडर्ड सहा एअरबॅग्ज, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, 35 सेफ्टी फीचर्स आणि 360-डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टम यासारख्या बेस्ट फीचर्स समाविष्ट आहेत.
किआने सायरोस ही कार 9 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 16.70 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
महिंद्रा XUV 3XO ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे आणि याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 15.56 लाख रुपये आहे.