फोटो सौजन्य: Freepik
हल्ली आपल्याला अनेक बाइक्समध्ये काही तरी भलतेच मॉडिफिकेशन्स पाहायला मिळतात. अनेक तरुणांना हे असे बाइकमधले बद्दल खूपच कूल वाटत असतात आणि त्याचमुळे ते सुद्धा आपल्या बाइकला मॉडिफाइड करतात. परंतु काही मॉडिफिकेशन्स असे सुद्धा आहेत जे केल्याने तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागू शकतो.
बाईकमध्ये अनेक प्रकारचे मॉडिफिकेशन्स केले जातात, जे बेकायदेशीर मानले जातात. जर तुम्ही तुमच्या बाईकमध्ये हे बदल केले तर चलन भरण्याची शक्यता सुद्धा वाढू शकते. पाहुयात बाइकमधील कोणत्या पार्टसमध्ये केलेले बदल तुमच्या अंगलट येऊ शकते.
खूप मोठ्या आवाजातील सायलेन्सर बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण सुद्धा वाढते. यामुळे पोलिसांकडून तुमच्याविरुद्ध चलन जारी केले जाऊ शकते आणि सायलेन्सर देखील जप्त होऊ शकते.
आरटीओच्या परवानगीशिवाय दुचाकीचा रंग बदलणे बेकायदेशीर आहे. जर तुम्ही तुमच्या बाइकचा रंग बदलला तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
नॉन-स्टँडर्ड नंबर प्लेट्स (जसे की लहान, फॅन्सी किंवा काळ्या नंबर प्लेट्स) वापरणे बेकायदेशीर आहे. जर तुमच्याकडे प्रमाणित नंबर प्लेट नसेल किंवा त्यामध्ये तुम्ही स्वतःहून बदल केले असतील तर तुमच्या विरुद्ध चलन जारी केले जाऊ शकते.
खूप उंच किंवा रुंद असलेले हँडलबार बेकायदेशीर आहेत. तसेच ते रस्त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात. अशा हँडलबारचा वापर केल्यास तुमच्याविरुद्ध चलन जारी केले जाऊ शकते.
खूप उंच किंवा अरुंद असलेल्या सीट्स या बेकायदेशीर आहेत आणि त्यामुळे बाइक चालवणे सुद्धा कठीण होऊ शकते.
अतिरिक्त किंवा लाल, निळे चमकणारे दिवे वापरणे बेकायदेशीर आहे. असे दिवे बाइकमध्ये वापरल्यास चलन जारी केले जाऊ शकते.
मानक आकाराच्या आरशांव्यतिरिक्त इतर आरसे वापरणे बेकायदेशीर आहे. नॉन-स्टँडर्ड मिरर वापरल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
गैर आकाराचे टायर वापरणे बेकायदेशीर आहे. तसेच ते गाडीची पकड कमी करू शकते. असे टायर वापरल्यास पोलिसांकडून चलन जारी केले जाईल.
या व्यतिरिक्त, इतर अनेक बदल आहेत जे बेकायदेशीर असू शकतात. बाइकमध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी ती कायदेशीर आहे याची खात्री करा. याबाबत तुम्ही RTO वेबसाइट किंवा मेकॅनिककडून माहिती मिळवू शकता.






