भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना (फोटो- सोशल मिडिया)
न्यूझीलंडचा संघ पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना आणि गोलंदाजी देखील काहीसा अपयशी ठरल्याचे दिसून आले. पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडने केवळ 185 रन्स केल्या. त्यानंतर हे टार्गेट भारताने सहज पूर्ण करत विजय प्राप्त केला. त्यामुळे आजचा सामना हा महत्वाचा असणार आहे. भारत हा सामना जिंकून सिरीजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड आपल्या पहिल्या विजयासाठी खेळताना दिसणार आहे.
IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…
नुकत्याच झालेल्या टी 20 सिरीजमध्ये भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला आहे. त्यामुळे वनडे संघांचा देखील आत्मविश्वास वाढला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ शानदार कामगिरी करताना दिसून येत आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि संपूर्ण टीमचे क्षेत्ररक्षण हे अत्यंत अचूक आणि चांगले झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील भारत अशीच चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे देखील संकट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास हा सामना किती ओव्हर्सचा होणार हे देखील पहावे लागणार आहे. मागच्या सामन्यात रोहित शून्यावर आउट झाला होता. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने रोहित शर्मासाठी ही सिरीज महत्वाची समजली जात आहे.
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.
Ans: दूसरा वनडे सामना पाऊस सुरू असल्याने अद्याप टॉस होऊ शकला नाही.
Ans: पहिल्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर आउट झाला होता.






