India Electric Car Sales Record 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतात Electric Car Sales 2026, Electric Cars India, EV Sales Record, Tata Motors EV आणि Mahindra Electric Cars यांनी यंदा मोठी मजल मारली आहे. देशातील इलेक्ट्रिक कार विक्रीने 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार करत आतापर्यंतचा वार्षिक विक्रम मोडला आहे. 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत भारतात 3,04,701 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे. डिसेंबरअखेर हा आकडा 3.25 लाख युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मागच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात 1,95,571 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली होती. यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच हा आकडा पार झाला असून, वर्षभरातील विक्रीत सुमारे 66% वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या काळात अनेक महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री 25,000 युनिट्सच्या पुढे राहिली. जूनमध्ये 33,640, जुलैमध्ये 34,717, तर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 38,440 कारची नोंदणी झाली.
भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!
टाटा मोटर्सची आघाडी कायम
भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. कंपनीने 9 नोव्हेंबरपर्यंत 1,20,895 इलेक्ट्रिक कारची विक्री केली असून, तिचा मार्केट शेअर 39.67% आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कार लिस्टमध्ये 7 मॉडेल्सचा समावेश आहे.
दुसऱ्या स्थानावर महिंद्राने झेप घेतली आहे. कंपनीने या काळात 69,660 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली असून, तिचा मार्केट शेअर 22.86% आहे. मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेएसडब्ल्यू एमजी मोटरची यंदा तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. कंपनीच्या 59,988 कारची नोंदणी झाली असून, मार्केट शेअर 18.70% आहे.
लक्झरी EV कंपन्यांचीही विक्री
मारुती सुझुकीने 12,390, तर व्हिनफास्टने 15,867 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली. किया, बीवायडी आणि ह्युंदाईची विक्री अनुक्रमे 7,612, 6,755 आणि 6,013 युनिट्स राहिली.
लक्झरी मार्केटमध्ये बीएमडब्ल्यूने 4,273 इलेक्ट्रिक कारची विक्री केली. मर्सिडीज-बेंझची विक्री 1,416, तर टेस्लाची 1,153 युनिट्स होती. व्होल्वोने 383 आणि पोर्शने 83 कारची नोंदणी केली.
एकूणच, भारतातील EV मार्केट वेगाने विस्तारत असून टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांमधील स्पर्धा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
Ans: 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत भारतात 3,04,701 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे. डिसेंबरअखेर हा आकडा 3.25 लाख युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
Ans: टाटा मोटर्स भारतातील इलेक्ट्रिक कार विक्रीत पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने 2026 मध्ये 9 नोव्हेंबरपर्यंत 1,20,895 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली असून, तिचा मार्केट शेअर 39.67% आहे.
Ans: महिंद्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत 69,660 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली असून, तिचा मार्केट शेअर 22.86% आहे.






