
India's Electric Vehicle Sales Surge in October (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतातील Electric Vehicle Sales मध्ये ऑक्टोबर 2026 मध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात या महिन्यात एकूण 3,54,625 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असून, मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ही वाढ 44.88% आहे. इलेक्ट्रिक दुचाकी, प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांना मिळालेल्या प्रतिसादामुळे EV मार्केटने नवा विक्रम नोंदवला आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये देशात 2,44,764 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. यंदा हा आकडा वाढून 3,54,625 युनिट्सवर पोहोचला. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचा सर्वात मोठा वाटा आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये 2,24,064 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. मागच्या वर्षी याच महिन्यात 1,50,890 दुचाकी विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच या सेगमेंटमध्ये वर्षभरात 48.49% वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक दुचाकींचा मार्केटमधील वाटाही 4.7% वरून वाढून 9.7% झाला आहे.
प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ दिसून आली. ऑक्टोबर 2026 मध्ये 37,049 इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री झाली. ऑक्टोबर 2025 मधील 20,995 युनिट्सच्या तुलनेत ही वाढ 76.47% आहे. या सेगमेंटचा मार्केटमधील वाटा 3.5% वरून 7.3% झाला आहे. यामुळे इलेक्ट्रिक कार्सकडे कस्टमर्सचा कल वाढत असल्याचे दिसते.
अल्ट्राव्हायोलेट X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपमध्ये लाँच! 343 km रेंज अन् 155 kmph टॉप स्पीड
इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची विक्री 24.76% वाढून 88,570 युनिट्सवर पोहोचली. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा आकडा 70,995 होता. तर इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांची विक्री 1,884 वरून वाढून 4,492 युनिट्स झाली. FADA चे अध्यक्ष साई गिरिधर यांच्या मते, ऑक्टोबरमध्ये एकूण वाहन विक्रीतील EV चा वाटा जवळपास 11.5% झाला. वर्षभरापूर्वी तो सुमारे 6% होता. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती, इलेक्ट्रिक वाहनांची सुधारलेली ड्रायव्हिंग रेंज आणि तुलनेने परवडणाऱ्या किमती यामुळे मागणी वाढत आहे. काही ठिकाणी मागणीच्या तुलनेत वाहनांचा पुरवठा कमी पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Ans: ऑक्टोबर 2026 मध्ये भारतात एकूण 3,54,625 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरपेक्षा ही विक्री 44.88% जास्त आहे.
Ans: इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री सर्वाधिक झाली. या महिन्यात 2,24,064 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली असून त्यात 48.49% वाढ नोंदवली गेली.
Ans: FADA च्या अध्यक्ष साई गिरिधर यांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण वाहन विक्रीतील इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा जवळपास 11.5% झाला. मागच्या वर्षी याच काळात हा वाटा सुमारे 6% होता.