2 लाखाचं डाउन पेमेंट आणि MG Hector शोरूममधून थेट तुमच्या घरी
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. अशीच एक कंपनी म्हणजे MG मोटर्स. या ब्रिटिश वाहन कंपनीने भारतात चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार लाँच केल्या आहेत. तसेच, कंपनीच्या इलेक्ट्रिक कार सुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणत लोकप्रिय आहेत.
ब्रिटिश ऑटोमेकर एमजी मोटर्स भारतीय ऑटो बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनीने ऑफर केलेली MG Hector देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊयात की दोन लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसाठी तुम्हाला किती मासिक ईएमआय द्यावा लागेल.
Raj Kumar Rao ने खरेदी केली ‘ही’ आलिशान कार, किंमत तब्बल 2.15 कोटी
एमजी मोटर्स हेक्टरचा बेस व्हेरिएंट 14 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केली जाते. राजधानी दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत अंदाजे 16.18 लाख रुपये आहे. तसेच यामध्ये अंदाजे 1.40 लाखांचा आरटीओ शुल्क आणि अंदाजे 64 हजारांचा विमा शुल्क, तसेच टीसीएस शुल्कासाठी 14 हजार रुपये समाविष्ट आहेत. त्यानंतर ऑन-रोड किंमत 16.18 लाख रुपये आहे.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच तुम्हाला कर्ज देईल. म्हणून, 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून अंदाजे 14.18 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजदराने ₹14.18 लाख कर्ज देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी फक्त 22,819 प्रति महिना EMI भरावा लागेल.
1 लाखाचं डाउन पेमेंट आणि देशातील सर्वात स्वस्त कारची चावी तुमच्या हातात असेल, EMI 5000 पेक्षा कमी
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 14.18 लाख रुपये इतका कार लोन घेतला, तर तुम्हाला दर महिन्याला 22,819 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत तुम्ही MG Hector साठी जवळपास 4.98 लाख रुपये इतका व्याज भराल. त्यामुळे एकूण या कारची एकूण किंमत सुमारे 21.16 लाख रुपये इतकी होईल.
JSW MG कडून Hector ही मिड-साईज एसयूव्ही म्हणून बाजारात आणली जाते. या सेगमेंटमध्ये तिला अनेक दमदार एसयूव्हींकडून स्पर्धा मिळते. याची थेट स्पर्धा Tata Harrier, Tata Safari, Mahindra Scorpio आणि Mahindra XUV 700 या लोकप्रिय एसयूव्ही आहेत.