फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. त्यात आता जीएसटी कमी झाल्याने त्यातही कार खरेदी करताना अनेक जण बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असतात. जर तुम्ही यंदाच्या दिवाळीत स्वस्तात मस्त कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर मग नक्कीच ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
देशातील आघाडीच्या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या Maruti Suzuki ने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने Maruti Alto K10 ही देशातील सर्वात परवडणारी कार म्हणून ऑफर केली गेली आहे. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला किती मासिक ईएमआय भरावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
डेअरिंग तर बघा! ग्राहकाने चक्क OLA शोरूमच्या समोरच जाळली कंपनीची स्कूटर, नेमकं कारण काय?
मारुती अल्टो K10 च्या बेस LXI व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 3.70 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर तुम्हाला अंदाजे 15,000 नोंदणी शुल्क आणि अंदाजे 21,000 रुपयांचा विमा भरावा लागेल. यामुळे याची ऑन-रोड किंमत 4.05 लाख रुपये होईल.
जर तुम्ही Maruti Alto K10 चे बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून कारच्या एक्स-शोरूम किंमतीवरच तुम्हाला कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत, तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 3.05 लाख रुपयांचे कर्ज बँकेतून घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदराने सात वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करते, तर पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 4916 रुपयांची EMI भरावा लागेल.
Royal Enfield बाईक खरेदी करणार आहात? कंपनीने 350cc Bikes मध्ये केला महत्वाचा बदल
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 3.05 लाख रुपयांचे कर्ज घेतले, तर तुम्हाला दरमहा 4916 रुपयांची ईएमआय भरावा लागेल. या कॅल्क्युलेशननुसार सात वर्षांच्या कालावधीत तुम्ही सुमारे 1.07 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे मारुती अल्टो K10 च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 5.12 लाख रुपये इतकी होईल.
मारुती सुझुकीची Alto K10 हॅचबॅक सेगमेंटमध्ये आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार मारुतीच्या Wagon R, S-Presso, Celerio, Renault Kwid, आणि Tata Tiago सारख्या बजेट फ्रेंडली कारशी स्पर्धा करते.