फक्त 8 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Tiago EV (फोटो सौजन्य: @RealMrHowMuch/x.com)
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार दमदार कार मार्केटमध्ये ऑफर करत असतात. सध्या ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम रेंज आणि फीचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. अशातच देशाची आघाडीची कार उत्पादक कंपनी Tata Motors ने सुद्धा दमदार अनेक इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. Tata Tiago EV ही त्यातीलच एक.
भारतीय मार्केटमध्ये, लोक अशा कारच्या शोधात असतात जी दररोजच्या प्रवासासाठी योग्य ठरेल. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर, कार चालवणे महाग झाले आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला अशी कार हवी आहे जी केवळ परवडणाऱ्या किमतीत चांगला मायलेज देण्यासोबतच फीचर्समध्येही उत्तम असेल. अशावेळी, इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला, Tata Tiago EV च्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
Moto Morini Seiemmezzo 650 झाली अजूनच स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
जर तुम्ही राजधानी दिल्लीमध्ये टाटा टियागो EV चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर RTO शुल्क आणि इन्शुरन्ससह एकूण किंमत सुमारे 8.44 लाख येते. यातून जर तुम्ही 3 लाख डाउन पेमेंट दिले, तर उर्वरित रकमेपैकी 5.44 लाख कर्ज म्हणून घ्यावे लागेल.
हे कर्ज जर 7 वर्षांसाठी 8% व्याजदराने घेतले, तर तुमचा मासिक EMI सुमारे 8,000 इतकी येईल. या कालावधीत तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात जवळपास 1.68 लाख अतिरिक्त द्यावे लागतील.
ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ आलेत! नवीन GST च्या दारानंतर ‘ही’ कार झाली डायरेक्ट 1.32 लाख रुपयांनी स्वस्त
ही EV दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंटमध्ये फुल चार्जवर सुमारे 250km रेंज मिळते, तर टॉप व्हेरिएंटमध्ये ही रेंज 315km पर्यंत जाते. टॉप व्हेरिएंटमध्ये 24kWh बॅटरी दिली आहे. ही कार DC 25kW फास्ट चार्जरद्वारे 10-80% फक्त 58 मिनिटांत चार्ज होते, तर 15Amp होम चार्जर वापरल्यास पूर्ण चार्जसाठी 15 ते 18 तास लागतात.