फोटो सौजन्य: Moto Morini India
भारतीय ऑटो बाजारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. यामागील कारण म्हणजे जीएसटीत झालेली कपात. आता छोट्या वाहनांवर 28 टक्के GST न लागता थेट 18 टक्क्यांचा टॅक्स लागणार आहे. यामुळे कित्येक बाईक आणि कार्सच्या किमतीत घट झाली आहे. हे सुधारित जीएसटी 22 सप्टेंबर रोजी अमलात येणार आहे. त्यामुळे अनेक वाहन खरेदीदार 22 सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच आता एका हाय परफॉर्मन्स बाईकवर सुद्धा धमाकेदार सूट मिळत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय मोटारसायकल उत्पादक कंपनी Moto Morini ने त्यांच्या Seiemmezzo 650 मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट केली आहे. या रेंजमध्ये, कंपनी Retro Street आणि Scrambler व्हेरिएंट ऑफर करते. या बाईक्सच्या किमतीत कपात केल्यानंतर, या बाईक्स आता आणखी चांगला पर्याय बनल्या आहेत. मोटो मोरिनीच्या बाइकची किंमत किती रुपयांनी कमी करण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ आलेत! नवीन GST च्या दारानंतर ‘ही’ कार झाली डायरेक्ट 1.32 लाख रुपयांनी स्वस्त
मोटो मोरिनीने या वर्षी सेमेझो बाईकच्या किमती कमी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2025 च्या सुरुवातीला 650 रेट्रो स्ट्रीटची किंमत 6.99 लाख रुपये होती, तर 650 स्क्रॅम्बलरची किंमत 7.10 लाख रुपये होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये या किमती 2 लाख रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. आता कंपनीने स्क्रॅम्बलरच्या किमती 91,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. कंपनीने किमती आणखी कमी केल्या आहेत आणि दोन्ही मॉडेल्सची किंमत 4.29 लाख रुपये करण्यात आली आहे.
या येणाऱ्या दोन्ही बाईकमध्ये एकच 649cc पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे, जे 55.7hp पॉवर आणि 54Nm टॉर्क निर्माण करते. किंमत कमी झाल्यामुळे या बाईक्स आता Royal Enfield Interceptor 650 (किंमत ₹3.10 लाख पासून) आणि Bear 650 (किंमत ₹3.46 लाख पासून) सारख्या देशांतर्गत बाईक्सच्या अधिक जवळ आल्या आहेत.
Skoda Octavia RS ‘या’ महिन्यात लाँच होण्यास सज्ज, कसे असतील फीचर्स?
कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, 21 सप्टेंबरपूर्वी बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 33,000 रुपयांची सूट मिळणार आहे. 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईकसाठी नवीन जीएसटी कर ब्रॅकेट लागू झाल्यानंतर त्याच्या किमती वाढणार आहे. म्हणूनच, सणासुदीच्या सिझनच्या पार्श्वभूमीवर, ब्रँडने आकर्षक कर्ज आणि EMI पर्यायांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये वाढीव कर्ज कालावधी आणि 95 टक्के पर्यंत कव्हरेज समाविष्ट आहे.