फोटो सौजन्य: @MotorOctane/ X.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत. ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Toyota Motors. टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. ग्राहक देखील कार खरेदी करताना टोयोटाच्या कार्सना पहिले प्राधान्य देत असते. जर तुम्ही सुद्धा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Toyota Hyryder तुमच्यासाठी बेस्ट कार ठरू शकते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला किती मासिक EMI द्यावा लागेल?
टोयोटाकडून अर्बन क्रूझर हायरायडर (Urban Cruiser Hyryder) या SUV चा बेस व्हेरिएंट E म्हणून सादर करण्यात येतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.95 लाख रुपये आहे.
Diwali 2025 मध्ये ‘हे’ काम करा, 100 टक्के वाहनांना फटाका टच सुद्धा करणार नाही
जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली, तर त्यावर अंदाजे 1.10 लाख रुपये RTO चार्जेस आणि सुमारे 53,000 रुपयांचा विमा प्रीमियम भरावे लागतील. तसेच TCS शुल्क म्हणून 13,948 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. या सर्व खर्चानंतर Toyota Hyryder ची ऑन-रोड किंमत अंदाजे 12.68 लाख रुपये इतकी होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर तुम्हाला कर्ज देईल. 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून अंदाजे 10.68 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 10.68 लाख दिले गेले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 17188 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 10.68 लाखांचे कार कर्ज घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 17188 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे, सात वर्षांमध्ये, तुम्हाला टोयोटा हायराइडरसाठी व्याज म्हणून अंदाजे 3.75 लाख रुपये द्यावे लागतील. तुमच्या कारची एकूण किंमत, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह, अंदाजे 16.43 लाख रुपये असेल.
Diwali 2025 मध्ये Royal Enfield च्या ‘या’ 5 बाईक मार्केट गाजवणार, GST मुळे किंमत झाली स्वस्त
टोयोटा हायराइडरला सब-फोर-मीटर एसयूव्ही म्हणून ऑफर करते. ती Maruti Victoris, Kia Seltos, Hyundai Creta, Honda Elevate, Maruti Grand Vitara, Volkswagen Taigun, Skoda kushaq, Mahindra XUV 700, Scorpio N सारख्या SUVs शी थेट स्पर्धा करते.