Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईर्टिगा आणि इनोव्हा क्रिस्टा टॅक्सीमध्ये किती वजनाचे आणि किती उंचीचे सामान नेता येते? जाणून घ्या RTO चे नियम!

केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार (CMVR) ईर्टिगा आणि इनोव्हा टॅक्सीच्या छतावर सामानाची उंची ३ फुटांपेक्षा जास्त नसावी. तसेच सुरक्षिततेसाठी अर्टिगावर ५०-६० किलो आणि क्रिस्टावर ७०-८० किलोपेक्षा जास्त वजन वाहून नेणे बेकायदेशीर आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 22, 2026 | 04:07 PM
ईर्टिगा आणि इनोव्हा क्रिस्टा टॅक्सीमध्ये किती वजनाचे आणि किती उंचीचे सामान नेता येते? जाणून घ्या RTO चे नियम!
Follow Us
Follow Us:

भारतातील ट्रॅव्हल आणि टॅक्सी व्यवसायात मारुती सुझुकी ईर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) या दोन गाड्यांना सर्वात जास्त पसंती दिली जाते. अनेकदा टॅक्सीचालक किंवा प्रवासी यांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो की, “या गाड्यांच्या टॅक्सीवर छतावर (Roof Carrier) किती उंचीपर्यंत सामान ठेवता येते आणि या गाड्या एकूण किती वजन वाहून नेऊ शकतात?”

केंद्रीय मोटार वाहन नियम आणि RTO च्या नियमांनुसार या दोन्ही गाड्यांची वहन क्षमता आणि सामानाची उंची किती असावी, याबद्दलचा हा सविस्तर लेख,

१. सामानाची उंची किती असावी?

केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार कोणत्याही कमर्शियल टॅक्सीच्या छतावर सामान ठेवताना उंचीबाबत कठोर नियम आहेत

  • उंचीची मर्यादा: गाडीच्या छतापासून वरती सामानाची उंची ३ फूट (अंदाजे ९० सेंटीमीटर) पेक्षा जास्त नसावी.
  • एकूण उंचीचा नियम: रस्त्यावरून जाताना गाडीची जमिनीपासूनची एकूण उंची (गाडीची स्वतःची उंची + कॅरियर + सामान) ही ३.८ मीटर (१२.४ फूट) पेक्षा जास्त होता कामा नये. अर्टिगा आणि क्रिस्टा या दोन्ही गाड्यांसाठी ३ फुटांची मर्यादा पाळणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
महत्त्वाची टीप: सामान जास्त उंच असेल तर पुलाखालून जाताना किंवा हायवेवरील झाडांच्या फांद्या लागून अपघात होण्याचा धोका असतो. तसेच, जास्त उंच सामानामुळे गाडीचा समतोल बिघडून गाडी उलटण्याचा धोका वाढतो.

फास्टॅग संपणार, जीपीएस टोल येणार; बँक खात्यातून थेट पैसे कट होणार! जाणून घ्या जीपीएस टोल सिस्टीमचं संपूर्ण गणित

२. गाड्यांची वजन वाहून नेण्याची क्षमता

टॅक्सी म्हणून चालताना गाडीमध्ये प्रवासी आणि त्यांचे सामान मिळून एकूण किती वजन ठेवता येईल, याची क्षमता आरटीओ आणि कंपनीने ठरवून दिलेली असते.

अ) मारुती सुझुकी ईर्टिगा

ईर्टिगा ही ७ सीटर फॅमिली आणि बजेट टॅक्सी म्हणून ओळखली जाते.

  • एकूण वहन क्षमता: साधारणपणे ५५० ते ६०० किलो (प्रवासी + सामान मिळून).
  • छतावरील कॅरियरची क्षमता: अर्टिगाच्या छतावर बसवलेल्या कॅरियरवर तुम्ही ५० ते ६० किलो पेक्षा जास्त वजन ठेवू नये.
  • वजनाचे गणित: जर गाडीत ७ प्रवासी बसले (सरासरी वजन ७० किलो धरल्यास = ४९० किलो), तर डिकीत आणि छतावर मिळून फक्त ६० ते १०० किलो सामान ठेवता येते.
ब) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

इनोव्हा क्रिस्टा ही अत्यंत मजबूत आणि शक्तिशाली इंजिन असलेली गाडी आहे, त्यामुळे तिची क्षमता अर्टिगापेक्षा जास्त आहे.

  • एकूण वहन क्षमता : साधारणपणे ६५० ते ७३० किलो (प्रवासी + सामान मिळून).
  • छतावरील कॅरियरची क्षमता: क्रिस्टाच्या छतावर मजबूत कॅरियर असल्यास त्यावर ७० ते ८० किलो पर्यंत सामान सुरक्षितपणे वाहून नेले जाऊ शकते.
  • वजनाचे गणित: ७ प्रवासी (४९० किलो) बसले तरीही क्रिस्टा १५० ते २०० किलो सामान सहज पेलू शकते.
कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?

ओव्हरलोडिंग केल्यास काय होते?

RTO च्या नियमांनुसार टॅक्सी गाड्यांवर मर्यादेपेक्षा जास्त सामान किंवा प्रवासी लादणे हा मोठा गुन्हा मानला जातो.

१. आरटीओ दंड : नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ओव्हरलोडिंग आढळल्यास टॅक्सी चालकाला मोठा आर्थिक दंड होऊ शकतो.

२. गाडीचे नुकसान: जास्त वजनामुळे टायर फुटणे, सस्पेन्शन (कमानी/शॉकअप) खराब होणे आणि इंजिन गरम होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

३. मायलेज कमी होते: गाडीवर जास्त वजन असेल तर इंजिनला जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे गाडीचे मायलेज कमालीचे घटते.

थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्ही अर्टिगा किंवा क्रिस्टा टॅक्सी चालवत असाल, तर छतावर सामानाची उंची ३ फुटांच्या आत ठेवा आणि प्रवाशांच्या वजनाचा अंदाज घेऊनच सामान लोड करा, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित आणि कायदेशीर राहील.

 

 

Web Title: Ertiga innova crysta luggage loading auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • taxi

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?
1

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
2

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
3

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
4

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.