फोटो सौजन्य: iStock
जगभरात इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळत आहे. देशात सुद्धा अनेक ऑटो कंपन्या अत्याधुनिक फीचर्ससह इलेक्ट्रिक कार लाँच करत असतात. नुकताच एक रिपोर्ट जारी झाला आहे, ज्यात जानेवारी 2025 मध्ये देशात एकूण किती इलेक्ट्रिक कारची विक्री झाली आहे, त्याबद्दल माहिती मिळाली आहे.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारना खूप पसंती मिळत आहे. नुकतेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशभरात किती इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या याची माहिती मिळाली आहे. चला जाणून घेऊया, इयर ऑन बेसिसच्या आधारावर ईव्हीची कामगिरी कशी राहिली आहे व कोणत्या कंपन्यांनी एकूण किती इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत.
जानेवारीत 2025 मध्ये Sub Four Meter SUV ची हवा, Tata च्या ‘या’ कारला सर्वाधिक मागणी
FADA ने जारी केलेल्या अहवालानुसार, जानेवारी 2025 मध्ये देशभरात एकूण 11266 युनिट इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या. ही वाढ वर्षानुवर्षे 32.38 टक्के आहे. परंतु मासिक आधारावर, गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 27.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये देशभरात 8822 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली.
जानेवारी 2025 मध्ये टाटा मोटर्सने सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकल्या. FADA च्या अहवालानुसार, गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने एकूण 5047 युनिट्स विकल्या. इयर ऑन बेसिस आधारावर, कंपनीने 13.01 टक्के नकारात्मक वाढ मिळवली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत टाटाने 5802 युनिट्सची विक्री केली होती. टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये टियागो, पंच, नेक्सॉन, टिगोर या इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे.
ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी भारतीय बाजारात एमजी कॉमेट ईव्ही, एमजी विंडसर ईव्ही, एमजी झेडएस ईव्ही देखील ऑफर करते. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 4237 युनिट इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली. विक्रीच्या बाबतीत, एमजी मोटर्स टाटानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर 252.20 टक्के वाढ साध्य केली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एमजी मोटर्सने 1203 युनिट इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली होती.
देशातील सर्वात स्वस्त EV साठी किती करावे डाउन पेमेंट? जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब
महिंद्रा भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्येही वाहने ऑफर करते. FADA च्या अहवालानुसार, जानेवारी 2025 मध्ये महिंद्राने 688 युनिट्स विकल्या आहेत. तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या कंपनीने 784 युनिट्स विकल्या होत्या.
दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात अनेक इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील ऑफर करते. गेल्या महिन्यात कंपनीने 321 युनिट्स विकल्या आहेत. यापूर्वी, जानेवारी 2024 मध्ये फक्त 170 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.
चिनी इलेक्ट्रिक कार कंपनी BYD ने जानेवारी 2025 मध्ये भारतीय बाजारात 313 इलेक्ट्रिक वाहने विकली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 162 युनिट्सची विक्री केली होती.