फोटो सौजन्य: @Aaronsmith333 (X.com)
देशात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आगमी काळात इलेक्ट्रिक वाहनं हेच ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचे भविष्य असणार आहे, असा विचार करून आज प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहे. आज अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कारसह अनेक अत्याधुनिक आणि बेस्ट सेफ्टी फीचर्स आणत आहेत.
एमजी मोटर्स देखील भारतात इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. यात खासकरून MG Comet EV उल्लेख केला पाहिजे. जेव्हा जेव्हा देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल बोलले जाते तेव्हा एमजी कॉमेट ईव्हीचे नाव सर्वात आधी येते. अलीकडेच या ईव्हीची किंमत वाढवण्यात आली आहे. असे असूनही, ही कार परवडणाऱ्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
भारतातील सर्वात युवा आमदाराची सगळीकडेच चर्चा, खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार
जर तुम्ही एमजी कॉमेट ईव्ही इलेक्ट्रिक कार कमी किमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. आज आपण या एमजी कारची ऑन-रोड किंमत आणि ईएमआयबद्दल जाणून घेणार आहोत.
एमजीच्या या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 7 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ही किंमत 9.65 लाख रुपये आहे. ही कार दिल्लीमध्ये 7.50 लाख रुपयांना खरेदी करता येईल. चला या कारच्या EMI बद्दल जाणून घेऊया.
एमजी कॉमेट ईव्ही दिल्लीमध्ये 50 हजार रुपयांचे डाउन पेमेंट देऊन खरेदी करता येईल. यासाठी तुम्हाला बँकेकडून 7 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्हाला हे कर्ज 8 टक्के व्याजदराने मिळाले आणि तुम्ही हे कर्ज 4 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला दरमहा 17 हजार रुपये ईएमआय भरावा लागेल आणि ४ वर्षांत तुम्हाला बँकेला एकूण 8.20 लाख रुपये द्यावे लागतील.
भारतातील पहिली बुलेटप्रूफ Rolls-Royce Cullinan अंबानींच्या दारात; किंमत जाणून थक्क व्हाल
एमजी कॉमेट ईव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 17.3 kWh ची बॅटरी पॅक दिला आहे. ही कार 42 पीएसची पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क निर्माण करते. याशिवाय, या कारमध्ये 3.3 किलोवॅटचा चार्जर देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ही कार 5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. त्याच वेळी, ही कार पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास लागतात. परंतु, 7.4 किलोवॅट एसी फास्ट चार्जरच्या मदतीने, ही कार फक्त 2.5 तासांत 0 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.
कंपनीच्या मते, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 230 किमीची रेंज देते. एमजी कॉमेट ईव्हीमध्ये 10.25 -इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्ससह हवामान माहिती आहे.