Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दिल्लीची फटफटीया’! काळाच्या पडद्याआड गेलेली भारतीय लोकांची जुगाडी कल्पना

'फटफटिया' हे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन सैन्याने सोडलेल्या हॉर्ली डेव्हिडसन आणि इंडियन चीफ सारख्या शक्तिशाली बाईक्सचा वापर करून दिल्लीत बनवलेले एक ऐतिहासि असे ३-व्हीलर जुगाडू वाहन होते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 24, 2026 | 10:51 PM
‘दिल्लीची फटफटीया’! काळाच्या पडद्याआड गेलेली भारतीय लोकांची जुगाडी कल्पना
Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल इतिहासात काही वाहने अशी झाली, ज्यांनी आपल्या अनोख्या रचनेमुळे आणि गरजेमुळे थेट एका संस्कृतीचे रूप घेतले. दिल्लीच्या रस्त्यांवर काही दशकांपूर्वी धावणारे ‘फटफटिया’ हे वाहन याच श्रेणीत येते. आज जरी हे वाहन रस्त्यांवरून गायब झाले असले, तरी विसाव्या शतकातील दिल्लीच्या सार्वजनिक वाहतुकीचा ते एक मुख्य कणा होते.

महायुद्धाचा वारसा आणि जुगाड

फटफटियाची कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून सुरू होते. महायुद्धानंतर अमेरिकन सैन्याने त्यांच्या वापरातील ‘हॉर्ली डेव्हिडसन’ आणि ‘इंडियन चीफ’ सारख्या अत्यंत शक्तिशाली आणि भारी वजनाच्या मोटरसायकली भारतातच सोडून दिल्या होत्या. या गाड्यांचे इंजिन प्रचंड ताकदीचे होते. दिल्लीतील स्थानिक मेकॅनिक्सनी या विदेशी मोटारसायकलींचा वापर करून एक भन्नाट जुगाड करायचे ठरवले.

‘घंटागाडी’ची सुरुवात महाराष्ट्रातील ‘या’ शहरातूनच झाली! ही आहे घंटागाडीची इंटरेस्टिंग गोष्ट!

त्यांनी या मोटरसायकलच्या पुढील भागाला म्हणजे हँडल आणि इंजिनला तसेच ठेवले आणि मागचे चाक काढून ७ ते ८ प्रवाशांना बसता येईल अशी एक मोठी लोखंडी किंवा लाकडी ट्रॉली वेल्डिंग करून जोडली. अशा प्रकारे एका २-व्हीलर बाईकचे रूपांतर ३-व्हीलर सार्वजनिक वाहतूक वाहनात करण्यात आले.

‘फटफटिया‘ नावाचा रंजक इतिहास

या वाहनाचे मूळ नाव काहीही असले, तरी दिल्लीकरांनी याचे नाव त्याच्या आवाजावरून ‘फटफटिया’ किंवा ‘फटफटी’ असे ठेवले. या गाडीमध्ये ७५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे इंजिन असायचे. जेव्हा ही गाडी प्रवाशांना घेऊन रस्त्यावरून धावायची, तेव्हा तिच्या सायलेन्सरमधून ‘फट-फट-फट-फट’ असा अतिशय मोठा आणि वेगळा आवाज यायचा. हा आवाज इतका प्रसिद्ध होता की, गाडी न पाहताही ती कुठून चालली आहे, हे लोकांना समजायचे. कनॉट प्लेस ते जुनी दिल्ली या मार्गांवर या गाड्या मोठ्या प्रमाणात धावायच्या.

गरज ही शोधाची जननी! तामिळनाडूच्या मासेमारांचे हे आहे जुगाड स्वदेशी ‘सुपरव्हेईकल’! ही आहे ‘मीन बॉडी वंडी’ थ्री-व्हीलरची गोष्ट

काळाच्या पडद्याआड गेलेला इतिहास

१९८० आणि १९९० च्या दशकापर्यंत फटफटियाने दिल्लीकरांना स्वस्त आणि वेगवान सेवा दिली. मात्र, २-स्ट्रोक इंजिन असल्यामुळे या गाड्यांमधून प्रचंड प्रमाणात धूर निघायचा आणि ध्वनी प्रदूषणही व्हायचे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने १९९८ च्या सुमारास या वाहनांवर पूर्णपणे बंदी घातली.

आज फटफटिया दिल्लीच्या रस्त्यांवर दिसत नसली, तरी जुन्या चित्रपटांमध्ये आणि ऑटोमोबाईलच्या इतिहासात तिचे स्थान अजरामर आहे. एका जागतिक दर्जाच्या लक्झरी बाईकचा वापर करून सामान्यांसाठी बनवलेली ही रिक्षा भारतीय कल्पकतेचे एक अप्रतिम उदाहरण मानली जाते.

Web Title: Fatfatiya of delhi automobile lifestyle culture news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:50 PM

Topics:  

  • automobile
  • delhi

संबंधित बातम्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
1

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
2

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

टीव्हीएसच्या स्कूटर्सची धूम! ज्युपिटरची विक्री 1.47 लाखांवर; आयक्यूबच्या विक्रीत 75.50% वाढ
3

टीव्हीएसच्या स्कूटर्सची धूम! ज्युपिटरची विक्री 1.47 लाखांवर; आयक्यूबच्या विक्रीत 75.50% वाढ

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज
4

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.