फोटो सौैजन्य: iStock
भारतात एसयूव्ही म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर एकच कार येते ती म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर. आज अनेक सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांच्या कार कलेक्शनमध्ये ही कार हमखास पाहायला मिळते. ही भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असलेली 7 सीटर प्रीमियम एसयूव्ही आहे. याचे दमदार डिझाइन, लक्झरी फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन यामुळे ती फॅमिली तसेच ऑफ-रोडिंग प्रेमींमध्ये आवडती कार ठरली आहे. याची एक्स-शोरूम किंमत ₹35.37 लाखांपासून सुरू होऊन ₹51.94 लाखांपर्यंत जाणारी ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यातील सर्वात परवडणारा मॉडेल म्हणजे 4×2 पेट्रोल व्हेरिएंट आहे.
जर तुम्ही ही 7 सीटर एसयूव्ही लोनवर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. राजधानी दिल्लीमध्ये टोयोटा फॉर्च्युनरच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 40.88 लाख आहे. लोनवर खरेदी केल्यास तुम्हाला 36.87 लाखांचे लोन मिळू शकते.
Citroen Aircross चा स्पेशल अवतार लवकरच मार्केटमध्ये होणार लाँच, मिळणार ताबडतोड फीचर्स
टोयोटा फॉर्च्युनर खरेदीसाठी किमान 4 लाख रुपये डाउन पेमेंट करणे आवश्यक आहे. मात्र, जर तुम्ही यापेक्षा जास्त डाउन पेमेंट केले, तर तुमचा दरमहा भरायचा ईएमआय कमी होईल, ज्यामुळे व्याजाचा भारही कमी पडेल.
जर तुम्ही 4 वर्षांसाठी लोन घेतले आणि बँकेने 9.8 % व्याजदर लावला, तर तुम्हाला दरमहा ₹93,179 इतका ईएमआय भरावा लागेल.
पाच वर्षांसाठी लोन घेतल्यास, दरमहा सुमारे 77,993 ईएमआय भरावा लागेल. ही मुदत थोडी वाढवल्यामुळे ईएमआय कमी होतो, पण व्याजाचा एकूण भार मात्र वाढतो.
Maruti Grand Vitara चा PHANTOM BLAQ Edition सादर, मिळणार एकदम खास फीचर्स
सहा वर्षांच्या मुदतीसाठी, 9% व्याजदराने ईएमआय ₹67,949 रुपये इतका राहील. हा पर्याय मासिक हप्ता कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.
सात वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, दरमहा सुमारे ₹60,842 रुपये भरावे लागतील. हा सर्वात कमी ईएमआयचा पर्याय असला तरी, एकूण व्याज रक्कम सर्वाधिक असेल.
टोयोटा फॉर्च्युनर सारखी प्रीमियम कार कर्जावर घेताना, बँकेच्या सर्व अटी आणि शर्ती नीट वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या बँका, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) आणि ऑनलाइन ऑटो लोन पुरवठादार यांच्या धोरणांनुसार व्याजदर, प्रोसेसिंग फी, डाउन पेमेंटची रक्कम आणि ईएमआयची अट वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी विविध पर्यायांची तुलना करूनच अंतिम निर्णय घ्यावा.
योग्य नियोजन, जास्तीत जास्त डाउन पेमेंट आणि योग्य कर्ज मुदत निवडल्यास, टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करणे आर्थिक दृष्ट्या सोपे होऊ शकते.