फोटो सौजन्य: @OlaElectric(X.com)
भारतीय मार्केटमध्ये Ola Electric ने आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. जेव्हा मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबद्दल कोणी ऐकले नव्हते, तेव्हा कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या होत्या. कालांतराने, EVs ला मिळणाऱ्या मागणीमुळे कंपनीच्या विक्रीत वाढ होऊ लागली. यानंतर कंपनीने बाईक सेगमेंटमध्ये देखील ई-बाईक लाँच केल्या. आता कंपंनी Ola Roadster X वर दमदार डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या नवीन Roadster X बाईकची डिलिव्हरी सुरू केली आहे. यासोबतच, कंपनीने ही बाईक खरेदी करणाऱ्या पहिल्या 5,000 ग्राहकांसाठी एक खास ऑफर देखील सादर केली आहे, ज्याची किंमत सुमारे 10,000 रुपये आहे. जर तुम्ही ही नवीन आणि स्टायलिश इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
मिर्झापूरचा ‘कालीन भैया’ बनला Hyundai चा नवीन ब्रँड अँबेसिडर, शाहरुख खानला केले रिप्लेस?
ओला द्वारे देण्यात येणाऱ्या तीन खास फायद्यांमध्ये मोफत MoveOS + सबस्क्रिप्शन, मोफत बॅटरी एक्सटेंडेड वॉरंटी आणि मोफत ‘Essential Care’ सेवा यांचा समावेश आहे.
आता तुम्हाला तुमच्या बॅटरीवर दीर्घ आयुष्याची हमी मिळेल. तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे न देता फ्रीबॅटरी एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार आहे.
याअंतर्गत, ओलाच्या क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड इत्यादी खास स्मार्ट फीचर्सचा प्रवेश मोफत उपलब्ध असेल.
मोफत ‘Essential Care’ सर्व्हिस
यामध्ये, तुम्हाला बाईकची १८ पॉइंट सुरक्षा आणि कामगिरी तपासणी, ब्रेक, टायर, एक्सल इत्यादींची व्यावसायिक सर्व्हिसिंग, तेही ओलाच्या अस्सल पार्ट्स आणि मोफत आवश्यक काळजी सेवेसह मिळेल.
कमाई कोटींची मात्र कार लाखांची ! RCB च्या ‘या’ खेळाडूकडे आहे सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त…
ओला रोडस्टरच्या प्रत्येक व्हेरियंटमध्ये आपल्याला खास फीचर्स मिळतात. यात 4.3-इंचाची एलसीडी स्क्रीन आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्स मोड सारखी फीचर्स आहेत. याशिवाय, ब्रेक-बाय-वायर तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे. यात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे, जेकमाई कोटींची मात्र कार लाखांची ! RCB च्या ‘या’ खेळाडूकडे आहे सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त…z
तुम्हाला रिअल टाइममध्ये टायरच्या स्थितीबद्दल माहिती देईल.
रोडस्टर एक्सच्या हार्डवेअर सस्पेंशनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात समोर टेलिस्कोपिक फोर्क, मागील बाजूस ड्युअल शॉकर्स आणि 180 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आहे, जे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर चांगला परफॉर्मन्स देईल. समोर 18-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस 17-इंच अलॉय व्हील्स आहेत. दोन्हीमध्ये ट्यूबलेस टायर्स आहेत.