फोटो सौजन्य: X.com
IPL 2025 ची फायनल मॅच येत्या 3 जून 2025 ला होणार आहे. RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. प्रत्येक खेळाडूने दमदार प्रदर्शन करीत टीमला फायनलमध्ये पोहचवले आहे. मात्र, यामध्ये सर्वात जास्त कौतुक होत आहे ते RCB च्या कर्णधारचे. हा कर्णधार म्हणजे रजत पाटीदार. IPL 2025 साठी रजत पाटीदारला 11 कोटी रुपयात रिटेन करण्यात आले होते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 9 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे त्यांचे चाहते खूप आनंदी आहेत. दरम्यान, संघाचा कर्णधार रजत पाटीदारने संघाच्या चाहत्यांचे आभार मानले आणि सांगितले की फक्त एक सामना शिल्लक आहे, त्यानंतर आपण एकत्र विजय साजरा करू. रजत पाटीदार खूप साधे जीवन जगतो. हे त्याच्याकडे असणाऱ्या कारवरून समजून येते.
Mahindra च्या ‘या’ कारची भलतीच क्रेझ ! आज बुक कराल तर एका वर्षानंतर मिळेल चावी
IPL 2025 पूर्वी, RCB ने रजत पाटीदारला 11 कोटी रुपयात रिटेन केले. यासोबतच, तो BCCI च्या ग्रेड C कराराचा भाग आहे, ज्यामुळे त्याला बोर्डाकडून दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात. मात्र, कोट्यवधींची कमाई असून सुद्धा त्याच्याकडे सामान्य माणसासारखी बजेट फ्रेंडली कार आहे. रजतकडे Hyundai i20 आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7 लाख रुपये आहे.
Hyundai i20 मध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे सहसा महागड्या कारमध्ये दिसतात. यात 10.25 इंचाचे मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येते. कारमध्ये 7-स्पीकरचे चांगले बोस साउंड सिस्टम आहे, जे उत्तम म्युझिक एक्स्पीरियंस देते. त्यात पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि इलेक्ट्रिक सनरूफ आहे.
यासोबतच, कारमध्ये 6 एअरबॅग्ज आणि TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) देखील देण्यात आली आहे. याशिवाय, एअर प्युरिफायर आणि ॲम्बियंट लाइटिंगसारख्या फीचर्ससह, हे कार टेक्नॉलजी आणि आरामाचे परिपूर्ण कॉम्बिनेशन बनते.
डोंगराळ भागात सुद्धा टिपटॉप चालेल Tata ची ‘ही’ कार, टिझरमध्ये दिसला SUV चा दम
Hyundai i20 मध्ये 1.2 लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 83.13 हॉर्सपॉवर पॉवर आणि 115 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ग्राहकांना दोन ट्रान्समिशन पर्याय मिळतात – 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, जे क्लासिक ड्रायव्हिंग फील देतो आणि 6-स्पीड CVT (iVT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, जो सुरळीत रायडिंग अनुभव देतो. हे इंजिन केवळ चांगला परफॉर्मन्स देत नाही तर फ्युएल एफिशियन्सीच्या बाबतीत देखील एक विश्वासार्ह पर्याय आहे.