फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)
भारतीय मार्केटमध्ये आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार कार्स ऑफर करत असतात. मात्र, भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फक्त उत्तम फीचर्स असणाऱ्या कार लाँच करून चालणार नाही हे माहीत असल्यामुळे अनेक कंपन्या बेस्ट ऑफर्स आणि डील देत असतात. याव्यतिरिक्त ब्रँड अँबेसिडरमुळे देखील कंपनी ग्राहकांच्या लक्षात राहत असते.
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांचे ब्रँड अँबेसिडर मुख्यतः बॉलिवूड अभिनेते असतात. यातच आता पंकज त्रिपाठी यांची भर पडली आहे. भारतीय मार्केटमध्ये ह्युंदाईच्या कार्स खूप लोकप्रिय आहेत. आता कंपनीने प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांना आपला नवीन ब्रँड अँबेसिडर केले आहे. यावेळी पंकज त्रिपाठी म्हणाले की त्यांची पहिली कार ह्युंदाई होती आणि माझे या ब्रँडशी वैयक्तिक नाते देखील आहे. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की मी साधेपणा आणि सत्यावर विश्वास ठेवतो आणि स्वतःला ह्युंदाईच्या विचारसरणीशी जोडतो.
कमाई कोटींची मात्र कार लाखांची ! RCB च्या ‘या’ खेळाडूकडे आहे सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त…
बॉलिवूड किंग शाहरुख खान 1998 पासून ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मात्र, पंकज त्रिपाठी शाहरुखची जागा घेतील की दोघेही वेगवेगळ्या कॅम्पेनमध्ये दिसतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ह्युंदाईने भारतात 29 वर्षे पूर्ण केली आहेत. आतापर्यंत कंपनीने भारतात 1 कोटी 27 लाख वाहने विकली आहेत. त्यापैकी 37 लाख वाहने निर्यात करण्यात आली आहेत. याची घोषणा करताना, ह्युंदाई मोटर इंडियाचे सीओओ तरुण गर्ग म्हणाले की, आम्ही पंकज त्रिपाठी यांचे ह्युंदाई कुटुंबात स्वागत करतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व आमच्या ब्रँडच्या मूल्यांशी जुळते आणि आम्हाला खात्री आहे की ते ग्राहकांशी जोडण्यास मदत करतील.
Hyundai Creta च्या टॉप लेव्हल फीचर्समुळे ही कार याच्या कॅटेगरीत सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनते. या कारमध्ये 10.25 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते.
Mahindra च्या ‘या’ कारची भलतीच क्रेझ ! आज बुक कराल तर एका वर्षानंतर मिळेल चावी
याशिवाय, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस मोबाइल चार्जर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स सारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील कारमध्ये आहेत.
हुंडई क्रेटामध्ये तीन व्हेरियंटचे इंजिन ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पहिला 1.5 लिटर MPi पेट्रोल इंजिन आहे, जो नॅचरली एस्पिरेटेड आहे. दुसरा पर्याय 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. याशिवाय, तिसरा पर्याय 1.5 लिटर CRDi डिझेल इंजिन आहे, जो लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखला जातो.