Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Force Motors ची दमदार कामगिरी; महसूल ९,१६७ कोटींवर, नफ्यात ५१% वाढ

Force Motors ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवत महसूल १३% वाढीसह ९,१६७ कोटी रुपयांवर नेला, तर निव्वळ नफा ५१% वाढून १,२११ कोटींवर पोहोचला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2026 | 05:50 PM
Force Motors ची दमदार कामगिरी; महसूल ९,१६७ कोटींवर, नफ्यात ५१% वाढ

Force Motors ची दमदार कामगिरी; महसूल ९,१६७ कोटींवर, नफ्यात ५१% वाढ

Follow Us
Follow Us:

फोर्स मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक आणि अग्रगण्य ऑटोमोटिव्ह कंपनीने आज ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाचे (चौथी तिमाही व आर्थिक वर्ष २०२५-२६) आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने प्रत्येक तिमाहीत सातत्यपूर्ण कामगिरी, सुधारित ऑपरेटिंग लेव्हरेज आणि सर्व उत्पादन विभागांमधील व्यापक वाढीमुळे आतापर्यंतची सर्वात उत्तम संपूर्ण वर्षाची आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. हे वर्ष फोर्स मोटर्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे, ज्‍यामधून कंपनीची केंद्रित, स्थिर आणि शिस्तबद्ध व्यावसायिक वृत्ती दिसून येते.

Electric Car: 710km रेंज आणि 9 मिनिटात 97% चार्जिंग, 1 महिन्यात ‘या’ इलेक्ट्रिक कारचा धमाका, 60 हजारपेक्षा जास्त ऑर्डर

कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ साठी उत्कृष्ट आर्थिक कामगिरी जाहीर केली आहे. यामध्ये वार्षिक महसूल १३% च्या वाढीसह ९,१६७ कोटी रुपयांवर पोहोचला असून, वार्षिक एबीटा ३९% च्या वाढीसह १,५९३ कोटी रुपये झाला आहे. चौथ्या तिमाहीत महसूल २,५८४ कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत ९% अधिक आहे. करपूर्व नफ्याच्या बाबतीत, कंपनीने पूर्ण वर्षासाठी ५५% ची प्रभावी वाढ नोंदवत १,३०४ कोटी रुपयांचा टप्पा गाठला, तर चौथ्या तिमाहीत हा आकडा ३७३ कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा २७४ कोटी रुपये नोंदवला गेला आहे जो मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत -३६% दिसत आहे, परंतु संपूर्ण आर्थिक वर्षाचा निव्वळ नफा ५१% च्या शानदार वाढीसह १,२११ कोटी रुपयांवर स्थिरावला आहे. कंपनीने गेल्या चार वर्षांत विक्रीवर ३०% चा भक्कम सीएजीआर कायम ठेवला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त राहिली असून, हे कंपनीच्या मजबूत आर्थिक स्थितीचे दर्शन घडवते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ ची कार्यात्मक वैशिष्ट्ये

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीने सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कार्यात्मक कामगिरी बजावली असून, मागील वर्षाच्या तुलनेत एकूण घाऊक विक्रीमध्ये २० टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली आहे. व्हॅन विभागात आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखत ‘ट्रॅव्हलर’ प्लॅटफॉर्मने सातत्याने ७० टक्क्यांपेक्षा जास्त बाजार हिस्सा आपल्याकडे ठेवला आहे, तर प्रीमियम मोबिलिटी क्षेत्रात ‘अर्बेनिया’ने वर्षभरात १०० टक्क्यांहून अधिक वाढीसह मोठी झेप घेतली आहे. ग्रामीण आणि अर्ध-शहरी बाजारपेठांमध्ये विस्तारावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ‘ट्रॅक्स’ प्लॅटफॉर्मला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, परिणामी या विभागात मागील वर्षाच्या तुलनेत ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय, संस्थात्मक आणि संरक्षण क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करत कंपनीने भारतीय सशस्त्र दलांसाठी विशेष उपयोगात येणाऱ्या वाहनांच्या महत्त्वाच्या ऑर्डर्स यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत, जे कंपनीच्या वैविध्यपूर्ण उत्पादन क्षमतेचे निदर्शक आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबाबत मत व्‍यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्‍टर) प्रसन फिरोदिया म्हणाले, “आमच्या स्थापनेपासूनच आम्ही नवनवीन विभागांची निर्मिती करण्यात अग्रणी राहिलो आहोत. आता अर्बेनियाच्या प्रबळ उपस्थितीद्वारे आम्ही प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी विभागात पुढाकार घेऊन त्याचे नेतृत्व करत आहोत, तर दुसरीकडे ट्रॅव्हलर आणि ट्रॅक्स सारखे प्लॅटफॉर्म बाजारपेठेत कंपनीचा विस्तार आणि व्याप्ती वाढवण्याचे काम सातत्याने करत आहेत. तसेच, संस्थात्मक आणि संरक्षण क्षेत्रातील ग्राहकांशी असलेल्‍या आमच्‍या सहयोगामधून आमची तांत्रिक अभियांत्रिकी क्षमता आणि आव्हानात्मक व सतत बदलणाऱ्या वातावरणात सेवा देण्याची आमची क्षमता दिसून येते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ हे आमच्या प्रवासातील एक अभूतपूर्व वर्ष ठरले आहे, जिथे प्रत्येक तिमाहीत झालेल्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीचे रूपांतर आतापर्यंतच्या आमच्या सर्वात प्रबळ आर्थिक कामगिरीमध्ये झाले आहे. ज्या क्षेत्रात आम्ही नेतृत्व करू शकतो आणि नवीन बाजारपेठ निर्माण करू शकतो अशा विभागांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, तसेच सुधारित ऑपरेटिंग लेव्हरेज आणि अधिक संतुलित प्रॉडक्ट मिक्सच्या पाठबळामुळे हे यश साध्य झाले आहे.

भविष्याचा विचार करता, आम्ही सातत्य आणि शिस्तीने व्यवसायाची उभारणी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत राहून आमची उत्पादने, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षमता अधिक दृढ करणे, हेच आमच्या वाढीच्या पुढच्या टप्प्यामध्‍ये महत्त्‍वाचे असेल.”

महिंद्राची विक्री वाढली! Mahindra SUV ग्राहकांचे विशेष आकर्षण; एप्रिल महिन्यात इतकी वाढ

Web Title: Force motors fy26 results revenue profit growth india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • automobile news
  • india

संबंधित बातम्या

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?
1

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
2

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
3

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
4

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.