Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

नुकतेच काही दिवसांपूर्वी MG Majestor ही एमजी मोटर्सची नवीन एसयूव्ही भारतात सादर झाली होती. ही एसयूव्ही थेट टोयोटा फॉर्च्युनर सोबत स्पर्धा करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 10:13 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात MG Majestor सादर
  • थेट टोयोटा फॉर्च्युनरसोबत असेल स्पर्धा
  • दोन्ही एसयूव्हींबद्दल जाणून घेऊयात
MG Majestor ही अलीकडेच भारतात एमजीची नवीन SUV म्हणून सादर करण्यात आली आहे. ही SUV MG Gloster ची जागा घेणार असून तिचे अधिकृत लाँच एप्रिल २०२६ मध्ये अपेक्षित आहे. तसेच, या कारची डिलिव्हरी मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रीमियम एसयूव्ही थेट Toyota Fortuner आणि Toyota Fortuner Legender यांना टक्कर देणार आहे. मोठ्या SUV सेगमेंटमध्ये Fortuner ने आधीच मजबूत स्थान निर्माण केले आहे. आता Majestor दमदार लूक, मोठी साइझ आणि आधुनिक फीचर्ससह स्पर्धेत उतरली आहे. चला तर मग फॉर्च्युनर आणि मॅजेस्टर या दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोण? याबद्दल जाणून घेऊयात.

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

साइझमध्ये कोण सरस?

आकाराच्या बाबतीत MG Majestor ही Toyota Fortuner पेक्षा लक्षणीय मोठी आहे. Majestor ही Fortuner पेक्षा सुमारे 251 मिमी लांब, 161 मिमी रुंद आणि 41 मिमी उंच आहे. तिचा व्हीलबेस देखील 205 मिमीने अधिक लांब आहे. त्यामुळे मॅजेस्टरमध्ये अधिक प्रशस्त केबिन आणि तिसऱ्या रांगेतील प्रवाशांना अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. रोड प्रेझेन्सच्या दृष्टीनेही मॅजेस्टर अधिक भक्कम आणि प्रभावी वाटते. त्यामुळे आकाराच्या बाबतीत मॅजेस्टर आघाडीवर दिसते.

इंजिन आणि पॉवरमध्ये फरक

MG Majestor मध्ये 2.0 लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. हे इंजिन अंदाजे 215 ते 218 बीएचपी पॉवर आणि 478 ते 480 एनएम टॉर्क निर्माण करते. तर दुसरीकडे Toyota Fortuner मध्ये 2.7 लिटर पेट्रोल इंजिन (मॅन्युअल गिअरबॉक्ससह) आणि 2.8 लिटर डिझेल इंजिन (ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये) उपलब्ध आहे. डिझेल इंजिन सुमारे 201 बीएचपी पॉवर आणि 500 एनएम टॉर्क देते.

पॉवरच्या बाबतीत मॅजेस्टर थोडी पुढे दिसते, तर टॉर्कच्या बाबतीत फॉर्च्युनरचे डिझेल इंजिन अधिक ताकदवान आहे. दोन्ही SUV दमदार ऑफ-रोडिंग क्षमतेसह येतात.

सुरक्षा आणि तंत्रज्ञान

Toyota Fortuner मध्ये 7 एअरबॅग्स, ईएससी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट, डाउनहिल असिस्ट, डिफरेंशियल लॉक आणि पार्किंग सेन्सर्ससारखी आवश्यक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. MG Majestor मध्ये मात्र लेव्हल-2 ADAS सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये लेन कीपिंग असिस्ट, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंगसारख्या आधुनिक सुविधा आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत Majestor अधिक प्रगत वाटते.

तुम्ही कोणती एसयूव्ही खरेदी करावी?

जर तुम्हाला मोठी साइझ, प्रशस्त केबिन आणि आधुनिक सेफ्टी फीचर्स असलेली SUV हवी असेल तर MG Majestor ही एक उत्तम पर्याय ठरू शकते. मात्र, मजबूत ब्रँड इमेज, जास्त टॉर्क आणि विश्वासार्हता महत्त्वाची वाटत असेल तर Toyota Fortuner आजही एक चांगला पर्याय आहे.

Web Title: Fortuner vs mg majestor which suv superior in terms of engine power and safety features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:13 PM

Topics:  

  • MG
  • Mg motors car
  • SUV
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या
1

Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!
2

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.