फोटो सौजन्य: X.com
जगभरातील कारमध्ये नवनवीन फीचर्स आणले जात आहेत. कधीकधी हे फीचर्स जीव देखील वाचवतात. सोशल मीडियावर अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये टेस्ला कारने एका भारतीयाचे प्राण वाचवले.
भारतीय तरुणाने सोशल मीडियावर त्याचा अनुभव शेअर केला. ही घटना ऋषी वोहरा नावाच्या व्यक्तीने X वर शेअर केली. ऋषीच्या पोस्टनुसार, त्याने नकळत 17 तास उपवास केला आणि नंतर एक औषध घेतले, ज्यामुळे त्याला ऍलर्जी झाली. त्याने त्याच्या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले की तो त्याच्या पत्नीशी फोनवर बोलत होता आणि नंतर कार चालवताना बेशुद्ध झाला. कारच्या ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टमला त्याची बेशुद्धी लक्षात आली आणि ताबडतोब कारचा वेग कमी केला. कारला रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबवले, इमर्जन्सी लाइट्स चालू केले आणि अपघात टळला. त्यानंतर ऋषीच्या पत्नीने आपत्कालीन सेवांना फोन करून त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
ऋषी वोहरा यांनी केलेला X वरील पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाली आहे. ही बातमी लिहिली जात असताना त्या पोस्टला 27 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत कमेंट्सही केल्या आहेत.
🚨 My Tesla literally saved my life yesterday. What started as a normal drive turned terrifying fast. I unintentionally fasted for 17 hours, took some medicine, and had a severe allergic reaction. My body shut down—I passed out while driving on the freeway, mid-conversation with… pic.twitter.com/kvPcafs24s — RV (@rishivohra) February 19, 2026
टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ Elon Musk यांनीही या व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया दिली. “तुम्ही ठीक आहात, याचा आनंद आहे” असे कॅप्शन देत त्यांनी हृदयाच्या इमोजीसह ती पोस्ट रीट्वीट केली. त्यांच्या या रीट्वीटलाही आतापर्यंत 23 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.






