फ्युचरेक्स ग्रुपतर्फे पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2025’ जाहीर
पुणे: वाहन निर्मितीत भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो (IIEV) 2025 च्या सातव्या आवृत्तीचे. फ्युचरेक्स ग्रुपने अधिकृतपणे जाहीर केले आहे. हे प्रदर्शन ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर मध्ये होणार आहे. देशातील प्रभावशाली ईव्ही उद्योगाचे प्रदर्शन ठरणार असून, भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी संक्रमणाला गती देण्यासाठी जगभरातील धोरणकर्ते, उत्पादक आणि गुंतवणूकदार एका व्यासपीठावर येणार आहेत. यामध्ये अद्ययावत, नावीन्यपूर्ण, पर्यावरणपूरक वाहतूकीसाठी उपाय आणि सातत्याने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील दूरदर्शी उपक्रमांचे प्रदर्शन केले जाणार आहे.
मागील यशस्वी सहा पर्वांनंतर, २०२५ चे आयोजन अधिक भव्य होत असून यामध्ये २१,००० पेक्षा अधिक अभ्यागत, ५,००० हून अधिक डीलर्स व डिस्ट्रीब्युटर्स, तसेच २०० हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत. ५ पेक्षा अधिक देशांमधून ७०० हून अधिक उद्योगतज्ज्ञ यात सहभागी होतील. या एक्स्पोमध्ये १००० पेक्षा अधिक प्रॉडक्ट्स व सेवांचे प्रदर्शन आणि १५० हून अधिक नवीन ईव्ही व क्लीन एनर्जी सोल्यूशन्सचे अनावरण होणार आहे.
या प्रदर्शनात इलेक्ट्रिक कार आणि बाइकपासून ई-रिक्षा, चार्जिंग स्टेशन यांसारख्या पायाभूत सेवा आणि उत्पादने यांचा सहभाग असेल. भारतामध्ये ईव्ही वापराचा दर झपाट्याने वाढत असताना आणि सरकारकडून ईव्ही इनोव्हेशन व उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असताना, या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाच ठरणार आहे.
फ्युचरेक्स ग्रुपचे संचालक नमित गुप्ता म्हणाले, “भारतातील ईव्ही बाजारपेठ नव्या टप्प्यावर पोहोचत असताना, हे व्यासपीठ दूरदर्शी धोरणकर्ते व उद्योगतज्ज्ञांना एकत्र आणेल. सरकार व उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने भारत जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये आघाडी घेईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
Nissan ची नवी SUV बाजारात आणणार ‘तुफान’, ऑक्टोबरमध्ये मोठी घोषणा; Creta Seltos ला आव्हान
या वेळी फ्युचरेक्स ग्रुपने सांगितले की, आमची महाराष्ट्र शासनाशी चर्चा सुरू असून राज्याच्या ईव्ही क्रांतीला गती देण्यासाठी हा एक्स्पो एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. भारतातील ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हे प्रदर्शन आयोजित होणे ही उद्योग क्षेत्राच्या परिवर्तनासाठी योग्य पार्श्वभूमी आहे.
राज्य सरकारांच्या ईव्ही धोरणांनी आणि पंतप्रधानांच्या ई-ड्राईव्ह योजनेने, राष्ट्रीय स्तरावर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यास आणि सार्वजनिक वाहतूक व व्यावसायिक उद्देशांसाठी ईव्ही खरेदीस सबसिडीमुळे, ईव्ही उत्पादन आणि वापरात मोठा हातभार लावला आहे. देशात ईव्हीच्या वापरात बेंगलोर, दिल्ली आणि मुंबईसारखी शहरे आघाडीवर असून, महाराष्ट्र आणि तामिळनाडू, ऑटो उत्पादकांसाठी मोठे केंद्र बनले आहे.
या प्रदर्शनात प्रमुख शासकीय अधिकारी, धोरणकर्ते, उद्योगतज्ज्ञ, ईव्ही उत्पादक, बॅटरी तंत्रज्ञान कंपन्या, आणि गुंतवणूकदार सहभागी होणार असून, उद्योगातील आव्हाने, तांत्रिक नवकल्पना आणि भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी रोडमॅपवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.