बापूंनाही होती गाड्यांची आवड! (फोटो सौजन्य: X.com)
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तर काहींनी आपले संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी खर्च केले. खरंतर जेव्हा कधी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलले जाते तेव्हा महात्मा गांधीजीबद्दल आवर्जून बोलले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी उभारलेले आंदोलन आणि मोर्चे आजही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. तसेच, त्यांच्या विचारांनी आजही भारत देशाला नवीन ऊर्जा मिळत आहे. म्हणूनच तर त्यांना देशाचे राष्ट्रपिता देखील म्हंटले गेले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशभरात अनेक चळवळींचे नेतृत्व केले, विविध ठिकाणी प्रवास केला. गांधी जयंतीनिमित्त, आपण अशा गाड्यांबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये प्रवास करून गांधीजींनी त्यांचा सन्मान केला. महात्मा गांधींनी या चळवळींचे नेतृत्व करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला. यातील बहुतेक कार गांधीजींच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या होत्या.
GST कमी झाला अन् एका झटक्यात ‘या’ बनल्या देशातील सर्वात स्वस्त कार, किमतीत 1 लाखांपर्यंतची घट
लिस्टमध्ये पहिलं नाव Ford Model A Convertible Car चे आहे. 1940 मध्ये झालेल्या रामगढ अधिवेशनाच्या वेळी गांधीजींनी या कारमधून प्रवास केला होता. ही कार रांचीचे रायसाहेब लक्ष्मीनारायण यांची होती, ज्यांनी ती खास आपल्या वापरासाठी 1927 मध्ये मागवली होती.
दुसरी लक्झरी कार म्हणजे Packard 120. ही कार 1940 मध्ये खरेदी करण्यात आली होती. गांधीजींनी सर्वाधिक प्रवास याच कारमधून केला होता. या कारचे मालक घनश्यामदास बिर्ला होते, जे गांधीजींचे जिवलग मित्र होते.
तिसरी कार म्हणजे Ford Model T. गांधीजींनी 1927 मध्ये रायबरेलीच्या सेंट्रल जेलमधून सुटका झाल्यानंतर या कारमधून प्रवास केला होता. ही कार अनेक वेळा रॅलींमध्ये विंटेज कार म्हणून पाहायला मिळाली आहे. मात्र या कारच्या मालकाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर ही विंटेज कार अनेक वेळा खरेदी-विक्री करण्यात आली आहे.
चौथी कार म्हणजे Studebaker President. गांधीजींच्या कर्नाटक दौऱ्यात या कारचा वापर करण्यात आला होता, जो त्या काळातील अतिशय महत्त्वाचा दौरा मानला जातो. 1926-33 दरम्यान बनवली गेलेली ही कार 90च्या दशकातील लोकप्रिय कारपैकी बनली होती.