फोटो सौजन्य: iStock
पूर्वी कार खरेदी करताना आपल्याला 28 टक्के GST देणे अनिवार्य होते. मात्र, आता 22 सप्टेंबरपासून कार खरेदी करताना आपल्याला फक्त 18 टक्के जीएसटी द्यावा लागत आहे. केंद्र सरकारने जीएसटीत केलेल्या सुधारणेनेमुळे ऑटो इंडस्ट्री आणि वाहन खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर, भारत सरकारने लहान कारवरील टॅक्स कमी केले आहेत (4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या आणि 1200 सीसी पेट्रोल/सीएनजी किंवा 1500 सीसी डिझेल इंजिन असलेल्या). याचा थेट परिणाम देशातील लोकप्रिय हॅचबॅक सेगमेंटवर झाला आणि त्यांच्या किमती कमी झाल्या. चला आज आपण टॉप पाच हॅचबॅक कारच्या नवीन किमतीबद्दल जाणून घेऊयात.
मारुती सुझुकीची सर्वात परवडणारी हॅचबॅक, मारुती एस-प्रेसोची किंमत 1.3 लाखांपर्यंत कमी करण्यात आली आहे. याची सुरुवातीची किंमत, एक्स-शोरूम, आता 3.5 लाख रुपये आहे. यात 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले, ड्युअल एअरबॅग्ज आणि एबीएस आहेत. त्यात सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे.
एंट्री-लेव्हल सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक असलेल्या मारुती अल्टो के10 च्या किमतीत 1.08 पर्यंत कपात करण्यात आली आहे. यात 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, एबीएस, सीएनजी पर्याय आणि एएमटी ट्रान्समिशन सारख्या फीचर्ससह येते.
ही मारुतीची तिसरी हॅचबॅक कार आहे, ज्याच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. Maruti Celerio च्या किमतीत तब्बल 94,000 रुपये पर्यंत घट झाली आहे. आता Celerio ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.7 लाख रुपये झाली आहे. यात 7-इंच इंफोटेनमेंट, 6 एअरबॅग्स, ESC सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय ही कार Petrol + CNG ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील Altroz च्या किंमतीत देखील मोठी कपात झाली आहे. याच्या किमतीत तब्बल 1.1 लाख रुपये पर्यंत घट झाली आहे. आता Tata Altroz ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये पासून सुरू होते. यात अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सनरूफ, वायरलेस चार्जर यांचा समावेश आहे. ही कार Petrol, Diesel, CNG या ऑप्शनसह उपलब्ध आहे.
GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
जीएसटी कपातीनंतर लोकप्रिय ह्युंदाई आय20 देखील खूपच स्वस्त झाली आहे. याची किंमत 97,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे एक्स-शोरूम किंमत 6.87 लाखांपासून सुरू होते. यात 10.25-इंच टचस्क्रीन, बोस साउंड सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल आणि सनरूफ यासारख्या अनेक उत्कृष्ट फीचर्सचा समावेश आहे.