फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात दुचाकींची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यातही आता ग्राहक आकर्षक लूक असणाऱ्या बाईक खरेदी करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल एन्फिल्ड देशात अशाच आकर्षक बाईक लाँच करत आहे. तरुणांमध्ये तर रॉयल एन्फिल्डच्या बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
कित्येक जणांचे स्वप्न असते की आपण रॉयल एन्फिल्डच्या बाईक खरेदी कराव्यात. याच मागणीमुळे कंपनीच्या बाईक झपाट्याने विकल्या जात आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 ही देशात विकल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी एक आहे. या बाईकच्या स्टायलिश लूकबद्दल तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. ही रॉयल एनफील्ड बाईक 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिनने सुसज्ज आहे. बाईकवरील हे इंजिन 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते.
On-Road Price आणि Ex-Showroom Price मध्ये काय फरक असतो?
हंटर 350 ची एक्स-शोरूम किंमत 1,49,900 रुपयांपासून सुरू होते. तुमच्या जवळील शोरूमनुसार, ही किंमत बदलू देखील शकते. ही बाईक खरेदी करण्यासाठी एकाच वेळी पूर्ण पैसे देण्याची गरज नाही, ती कर्जावर देखील खरेदी करता येऊ शकते.
रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या बेस मॉडेल रेट्रो फॅक्टरीची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत 1.73 लाख रुपये आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.64 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. बाईक खरेदी करण्यासाठी किती बँक लोन घ्यावे लागते हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त रक्कमेचे कर्ज मिळू शकते. हंटर 350 तुमच्या नावावर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 8,646 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल.
जर तुम्ही ही रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्यासाठी दोन वर्षांसाठी कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला 24 महिन्यांसाठी सुमारे 8,100 रुपये ईएमआय भरावा लागेल.
हंटर 350 खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही तीन वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 36 महिन्यांसाठी बँकेत 5,800 रुपये ईएमआय जमा करावे लागतील.
कार असो की बाईक, चुकीचा Challan जारी झाल्यास तक्रार कशी कराल?
ही रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्यासाठी, जर चार वर्षांसाठी कर्ज घेतले तर दरमहा 9 टक्के व्याजदराने 4,700 रुपये बँकेत हप्त्या म्हणून जमा करावे लागतील.
बाईक खरेदी करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असले तरी, कर्ज घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. बँकांच्या धोरणानुसार, या ईएमआय आकड्यांमध्ये फरक दिसून येतो.