फोटो सौजन्य: iStock
अनेकदा वाहन चालवताना आपल्याला एक मेसेज येतो, ज्यात आपण वाहतुकीचे नियम मोडले आहे त्याबद्दल चालान भरावा लागेल असे लिहिले असते. अशावेळी अनेक जण गोंधळून जातात. जे नियम आपण मोडलेच नाही त्याबद्दल चालान का द्यावा? असा प्रश्न त्यांच्या मनात येतो.
काही वेळेस तर सर्व डॉक्युमेंट असून देखील आपल्याविरोधात चालान जारी होते. अशावेळी गोंधळून न जाता आपण या बद्दल तक्रार कसे करू शकतो त्याबद्दल जाणून घेऊया.
बाईक किंवा स्कूटर कधी जास्त धूर सोडू लागते, याचा परफॉर्मन्सवर परिणाम होतो का?
रस्त्यावर कार किंवा बाईक चालवताना तुम्ही वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. जर तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले तर या परिस्थितीत तुमचे चालान कापले जाऊ शकते. रस्त्यावर कार किंवा बाईक चालवण्यासाठी बनवलेले नियम रस्ते वाहतूक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने आहेत. त्याच वेळी, अनेकदा असे दिसून येते की एखाद्या व्यक्तीकडे वाहन चालवताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे असतात. यानंतरही अनेक वेळा वाहतूक पोलिसांकडून चुकीचे चालान जारी केले जाते. या परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला चलन भरण्याचीही गरज नाही. चुकीच्या ट्रॅफिक चालानविरुद्ध तुम्ही कुठे आणि कशी तक्रार दाखल करू शकता त्याबद्दल जाणून घेऊया.
जर तुमचे ट्रॅफिक चालान चुकीचे असेल तर तुम्हाला तुमचा पुरावा जोडून helpdesk-echallan@gov.in वर मेल पाठवावा लागेल.
तुम्ही सकाळी 6:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत +91-120-4925505 वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.






