फोटो सौजन्य: @MoreMotorcycles (X.com)
भारतात बाईकची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात आता इलेक्ट्रिक बाईकची मागणी देखील वाढली आहे. देशभरात विविध सेगमेंट्समध्ये बाईकची विक्री होऊन, विविध ऑटो ब्रँड्सच्या बाईकला चांगली पसंती मिळते. परंतु, काही ब्रँड्सच्या बाईकची लोकप्रियता आणि क्रेझ अधिक आहे. त्यात विशेषतः Royal Enfield च्या बाईकचा उल्लेख करावा लागेल. या कंपनीच्या बाईकचे डिझाईन, आवाज आणि परफॉर्मन्स भारतीय बाईक राइडर्समध्ये खूप प्रिय आहे. Royal Enfield ने बाईक राइडिंगला एक वेगळी ओळख दिली आहे.
रॉयल एनफील्डच्या बाईक्स भारतीय मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आजही कित्येक तरुणांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी. कंपनीच्या बाईक्समध्ये हंटर 350 देखील खूप लोकप्रिय मानली जाते. या बाईकच्या स्टायलिश लूकबद्दल तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. चला या दमदार बाईकच्या किंमतीबद्दल जाणून घेऊयात.
रॉयल एनफील्ड हंटर 350 ची एक्स-शोरूम किंमत 1,49,900 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक खरेदी करण्यासाठी एकाच वेळी पूर्ण पैसे देण्याची गरज नाही. ही बाईक लोनवर देखील खरेदी करता येईल.
रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या बेस मॉडेल रेट्रो फॅक्टरीची किंमत दिल्लीमध्ये 1.73 लाख रुपये आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.64 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. हंटर 350 वर आपले नाव कोरण्यासाठी तुम्हाला 8,646 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल.
जर तुम्ही ही रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्यासाठी दोन वर्षांचे कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर जर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला २४ महिन्यांसाठी सुमारे ८,१०० रुपये ईएमआय भरावा लागेल.
हंटर 350 खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही तीन वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 36 महिन्यांसाठी बँकेत दरमहा 5,800 रुपये ईएमआय जमा करावे लागतील.
ही रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्यासाठी, जर चार वर्षांसाठी कर्ज घेतले तर दरमहा 9 टक्के व्याजदराने 4,700 रुपये बँकेत हप्ते म्हणून जमा करावे लागतील.
रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन आहे. या बाईकमधील इंजिन 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच, यात 5-स्पीड गिअरबॉक्स, 13-लिटर इंधन टाकी आणि 36.2 किमी प्रति लिटर मायलेज आहे.