दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? फोटो सौजन्य: iStock
कार्सच्या जाहिरातीत अनेकदा त्यांची एक्स शोरूम किंमत दाखवली जाते. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा टॅक्समुळे कारची किंमत वाढते, ज्याला आपण ऑन रोड किंमत असे देखील म्हणू शकतो. सध्या कित्येक कार खरेदीदार वाहनांवरील असणाऱ्या जीएसटीमुळे त्रस्त आहेत. अशातच आता केंद्र सरकार वाहनांवरील GST कमी करण्याची तयारी करत आहे.
यंदाच्या दिवाळीत मोदी सरकार छोट्या कारसह अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. सध्या या कार्सवर 28% जीएसटी आणि 1% सेस म्हणजेच एकूण 29% कर आकारला जात आहे. पण जर हा टॅक्स 18% पर्यंत कमी केला तर ग्राहकांना थेट 10 टक्क्यांचा फायदा मिळेल. उदाहरणार्थ, जर कारची एक्स-फॅक्टरी किंमत 5 लाख रुपये असेल, तर 29% कर जोडल्यानंतर ती 6.45 लाख रुपये होते. पण जर जीएसटी 18% पर्यंत कमी केला तर किंमत फक्त 5.90 लाख रुपये होईल. म्हणजे खरेदीदाराचे सुमारे 55,000 रुपये वाचतील. त्याचप्रमाणे, 10 लाख रुपयांच्या कारवर सुमारे 1.10 लाख रुपयांची बचत होऊ शकते.
Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
जर खरंच केंद्र सरकारने कारवरील GST कमी केला कोणत्या कारवर किती रुपयांची बचत होईल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
सध्या Alto K10 ची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 4.23 लाख रुपये आहे. यावर 29% टॅक्स म्हणजेच 1.22 लाख रुपये जोडले जातात. जर GST कमी होऊन 18% झालाच, तर हा टॅक्स फक्त 80,000 रुपये असेल. म्हणजेच ग्राहकांची Alto खरेदी करताना सुमारे 42,000 रुपयांची बचत होऊ शकते.
सध्याची WagonR ची सुरुवातीची किंमत 5.78 लाख रुपये आहे. सध्या या कारवर 1.67 लाख रुपयांचा टॅक्स बसतो. GST कमी झाल्यास हा टॅक्स 1.09 लाख रुपये होईल. म्हणजे WagonR घेणाऱ्यांना जवळपास 58,000 रुपयांचा फायदा मिळेल.
Swift ची सध्याची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये आहे, ज्यामध्ये सुमारे 1.88 लाख रुपयांचा टॅक्स समाविष्ट आहे. GST कमी झाल्यानंतर हा टॅक्स फक्त 1.23 लाख रुपये राहील. त्यामुळे Swift वर सुमारे 65,000 रुपयांची बचत होईल.
2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
त्याचप्रमाणे, Dzire ची सध्याची किंमत 6.83 लाख रुपये आहे. या कारवर सुमारे 1.98 लाख रुपयांचा टॅक्स आहे. GST कमी झाल्यावर हा कर घटून 1.29 लाख रुपये होईल. म्हणजे Dzire खरेदी करताना ग्राहकांना जवळपास 68,000 रुपयांचा फायदा मिळेल.
Brezza ची सुरुवातीची किंमत 8.69 लाख रुपये आहे. सध्या यावर 2.52 लाख रुपयांचा टॅक्स लागतो. GST 18% झाल्यावर हा टॅक्स फक्त 1.65 लाख रुपये होईल. म्हणजे Brezza वर ग्राहकांना जवळपास 87,000 रुपयांची बचत होईल. तर Ertiga ची किंमत 9.11 लाख रुपये आहे. सध्या यावर 2.64 लाख रुपयांचा टॅक्स लागतो. GST कमी झाल्यावर हा टॅक्स फक्त 1.73 लाख रुपये असेल. म्हणजेच Ertiga खरेदी करणाऱ्यांची जवळपास 91,000 रुपयांची बचत होऊ शकते.