फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. त्यामुळेच तर देशात लाखो कार्सची विक्री होताना दिसते. पण यातही काही अशा कार आहेत, ज्यांनी भारतीय ग्राहकांना भुरळ घातली आहे. नुकतेच फेब्रुवारी 2025 मध्ये एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यात टॉप 5 कंपनीच्या कारबद्दल माहिती मिळाली आहे.
भारतीय मार्केटमध्ये, वाहन उत्पादकांकडून विविध सेगमेंटमध्ये कार विकल्या जातात. तसेच मार्केटमध्ये MPV आणि SUV सेगमेंटमध्ये अनेक उत्तम वाहने उपलब्ध आहेत. अहवालांनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये किती 7 सीटर एमपीव्ही आणि एसयूव्ही विकल्या गेल्या आहेत आणि टॉप-5 मध्ये कोणकोणांचा समावेश आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
रिपोर्ट्सनुसार, देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुतीकडून एर्टिगा विकली जाते. गेल्या महिन्यात कंपनीने या एमपीव्हीच्या 14868 युनिट्स विकल्या. इयर ऑन इयर बेसिसनुसार, या कारच्या विक्रीत 4 टक्क्यांनी घट झाली आहे, परंतु तरीही ती पहिल्या क्रमांकावर आहे.
महिंद्राकडून सात-सीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओ एन या कार ऑफर केल्या जातात. फेब्रुवारी 2025 मध्ये विक्रीच्या बाबतीत दोन्ही एसयूव्ही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या महिन्यात स्कॉर्पिओ ब्रँडच्या एसयूव्हीची एकूण विक्री 13618 युनिट्स होती. तर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांची एकूण विक्री 15051 युनिट्स होती. इयर ऑन इयर बेसिसनुसार, त्याच्या विक्रीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे.
स्कॉर्पिओ व्यतिरिक्त, महिंद्रा त्यांची 7 सीटर असलेली क्लासिक एसयूव्ही बोलेरो देखील देते. कंपनीची ही एसयूव्ही शहरांसह ग्रामीण भागातही सर्वाधिक पसंतीच्या एसयूव्हींपैकी एक आहे. मार्च 2025 मध्ये एकूण 8690 युनिट्स विकल्या गेल्या. तर फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 10113 युनिट्स विकल्या गेल्या. इयर ऑन इयर बेसिसनुसार, या कारची विक्रीही वर्षानुवर्षे 14% ने घटली आहे.
जपानी ऑटोमेकर टोयोटा कडून इनोव्हा बऱ्याच काळापासून ऑफर केली जात आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 8449 युनिट्स विकल्या गेल्या. तर गेल्या वर्षी त्यातील 8481 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.
गेल्या महिन्यात, महिंद्राची XUV 700 सात-सीटर MPV आणि SUV विभागातील टॉप-5 यादीत शेवटच्या स्थानावर होती. मार्च 2025 मध्ये या कारचे एकूण 7468 युनिट्सची विक्री झाली आहे. तर याआधी फेब्रुवारी 2024 मध्ये ही एसयूव्ही 6546 लोकांनी खरेदी केली होती. इयर ऑन बेसिसच्या आधारावर या कारच्या विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.