फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. मार्केटमधील हीच वाढती मागणी पाहता अनेक ऑटो कंपन्या उत्तम फीचर्स असणाऱ्या बेस्ट कार ऑफर करते. पण या सर्वात काही अशा देखील कार आहेत, ज्यांच्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. आज आपण अशाच एका कारबद्दल जाणून घेणार आहोत, जिला फेब्रुवारी 2025 मध्ये फक्त एकाच ग्राहकाने विकत घेतले आहे.
जेव्हा सिट्रोएनने भारतीय बाजारात त्यांची C5 Aircross लाँच केली तेव्हा ती प्रीमियम एसयूव्ही म्हणून सादर करण्यात आली. पण आज या कारची परिस्थिती अशी आहे की ही कार मार्केटमध्ये फ्लॉप ठरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या कारच्या मागणीत कोणतीही वाढ दिसून येत नाहीये. गेल्या 6 महिन्यांत, याचे फक्त 7 युनिट्स विकले गेले आहेत आणि फेब्रुवारी 2025 मध्ये, या कारला फक्त १ ग्राहक मिळाला आहे. चला या कारच्या गेल्या 6 महिन्यांच्या विक्री अहवालाबद्दल जाणून घेऊया.
कार खरेदीदारानो लक्ष द्या ! महाराष्ट्रात April 2025 पासून ‘या’ 5 कारची किंमत वाढण्याची शक्यता
सप्टेंबर 2024 मध्ये सिट्रोएन C5 एअरक्रॉसचे फक्त 1 युनिट विकले गेले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये 4, नोव्हेंबर 2024 मध्ये 0, डिसेंबर 2024 मध्ये 1 युनिट, जानेवारी 2025 मध्ये 0 आणि फेब्रुवारी 2025 मध्ये 1 युनिट विकले गेले आहे.
गेल्या 6 महिन्यांत या एसयूव्हीला फक्त 7 ग्राहक मिळाले आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये, या कारला जास्तीत जास्त 4 ग्राहक मिळाले. परंतु, नोव्हेंबर 2024 आणि जानेवारी 2025 मध्ये या कारकडे ग्राहकांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे. चला जाणून घेऊया सिट्रोएन C5 एअरक्रॉसची विक्री का कमी होत आहे?
सिट्रोएन C5 एअरक्रॉसची किंमत सुमारे 37 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, जे दर्शवते की ती प्रीमियम आणि लक्झरी एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्थान मिळवते. या रेंजमध्ये, टोयोटा फॉर्च्युनर, ह्युंदाई टक्सन आणि जीप मेरिडियन सारख्या शक्तिशाली कार आहेत, ज्या या कारसोबत स्पर्धा करत आहेत.
2 लाखात घरी आणा Honda City चा बेस व्हेरियंट ! दरमहा भरावा लागेल फक्त ‘इतकाच’ EMI
सिट्रोएन हा भारतातील एक नवीन ब्रँड आहे आणि लोकांना त्यावर विश्वास बसण्यास वेळ लागत आहे. या ब्रँडच्या तुलनेत लोक हुंडई, टोयोटा आणि टाटा सारख्या ब्रँडना अधिक प्राधान्य देत आहेत.
या एसयूव्हीमध्ये सनरूफ, एडीएएस, 360 डिग्री कॅमेरा यासारखे प्रीमियम फीचर्स नाहीत. दुसरीकडे या सर्व गोष्टी कमी किमतीत येणाऱ्या इतर एसयूव्हीमध्ये उपलब्ध आहेत.