फोटो सौजन्य: iStock
भारतात कित्येक जणांना हाय परफॉर्मन्स वाहनांची रेसिंग पाहण्याचा छंद असतो. जर तुम्ही सुद्धा रेसिंग पाहण्याचे शौकीन असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे येत्या 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी गोव्यात पहिल्यांदाच Goa Street Race 2025 आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे की गोवा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेसचे आयोजन करणार आहे. गोवा स्ट्रीट रेस 2025 चे आयोजन 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी होणार असून ही रेस Indian Racing Festival (IRF) च्या 4th Round चा भाग असेल. रेसिंग ट्रॅकचे ठिकाण Headland Sada, Bogda येथे निश्चित केले गेले आहे, जिथे 3.214 km लांबीचा ओशनफ्रंट सर्किट तयार करण्यात आला आहे.
20 Km चा मायलेज आणि ADAS सेफ्टी फिचर असणाऱ्या ‘या’ कारवर वर 2.25 लाखाची सूट
RPPL चेअरमन आणि एमडी अखिलेश रेड्डी यांनी सांगितले की ट्रॅकची लांबी 3.214 km असून त्यात जवळपास 12 ते 14 हाय-स्पीड कर्व्ह्स असतील. हा ट्रॅक FIA ग्रेड-3 सर्टिफिकेशन सह बांधला जाईल. यामध्ये युरोपमधून आणलेले सेफ्टी बॅरिअर्स, काँक्रीट ब्लॉक्स आणि डेब्रिस फेंसिंग बसवले जातील.
येथे Formula-4 कार 180-190 km/h पर्यंत स्पीड पकडतील. ट्रॅकवर Night Races घेण्याची सोय असून भविष्यात विस्ताराचीही शक्यता आहे. या ट्रॅकवर 15,000 ते 20,000 प्रेक्षकांची सोय असेल आणि अतिरिक्त स्टँड्स देखील लावले जातील.
एकूण प्रकल्पावर 127 कोटी खर्च होत आहे. यामध्ये ₹27 कोटी लायसन्स आणि इतर खर्चांसाठी, तर 25 कोटी गोवा सरकारकडून इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यात येणार आहे. उर्वरित 70% खर्च RPPL करणार आहे. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार ट्रॅक उभारण्यासाठी फक्त 3 ते 3.5 महिने लागतील आणि रेस संपल्यानंतर 15-20 दिवसांत रस्ता पुन्हा सामान्य वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
GST कमी झाल्यानंतर Force Motors चे ‘हे’ मॉडेल झाले स्वस्त, किती असेल किंमत?
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की हे इन्फ्रास्ट्रक्चर केवळ रेसिंगपुरते मर्यादित राहणार नाही, तर त्याचा वापर Marathon, Cyclothon आणि इतर स्पोर्ट्स इव्हेंट्स साठीही केला जाईल. या उपक्रमामुळे गोव्याची ओळख फक्त “Sun, Sand and Sea” पुरती मर्यादित न राहता ती Sports Tourism पर्यंतही जाईल.
रेड्डी यांनी आणखी सांगितले की या आयोजनामुळे मोटरस्पोर्ट्सला चालना मिळेल आणि Sourav Ganguly, John Abraham, Arjun Kapoor आणि Sudeep यांसारख्या सेलिब्रेटी टीम ओनर्सच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढेल.