Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ आहेत भारतातील ५ सर्वात स्वस्त Electric Car, जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सना रोज चांगली मागणी मिळत आहे. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशाच स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार्सबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 20, 2024 | 07:29 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असतानाच, इलेक्ट्रिक कारला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यामुळेच इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीत सुद्धा चांगलीच वाढ झाली आहे. वाढत्या चार्जिंग पायाभूत सुविधांमुळे, अधिकाधिक नवीन कार खरेदीदार इलेक्ट्रिक कार निवडताना दिसत आहे. पण इलेक्ट्रिक कारच्या महाग किमंतीमुळे लोकं अशा कार्स खरेदी करण्याचा विचार टाळत आहे. चला तर मग, आम्ही सांगतो तुम्हाला या सेगमेंटमधील पाच सर्वात स्वस्त कार्स.

MG Comet EV

ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असून ही कार तीन दरवाज्यांसह येते. या मायक्रो-इलेक्ट्रिक हॅचबॅक कारमध्ये 17.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जे एका चार्जवर 230 किमीपर्यंतची रेंज देते. यामध्ये असलेली बॅटरी पॅक 42 PS ची पॉवर आणि 110 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, 12V पॉवर आउटलेट, USB चार्जिंग पोर्ट आणि कीलेस एंट्री यांसारखे फीचर्स आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे.

Tata Tiago EV

टाटा कंपनीची ही कारसुद्धा भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. MG Comet EV लाँच करण्यापूर्वी, ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होती. ही कार 19.2 kWh आणि 24 kWh च्या बॅटरी पॅकसह येते. 19.2 kWh बॅटरी पॅक 61 PS पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करते. तर, 24 kWh बॅटरी पॅक 75 PS पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. 19.2 kWh आणि 24 kWh बॅटरी पॅकची रेंज अंदाजे 250 किमी आणि 315 किमी आहे. हे डीसी फास्ट चार्जरसह येते. Tata Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाखांपासून ते 11.89 लाखांपर्यंत आहे.

Tata Punch EV

टाटा कंपनीची ही कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. या कारमध्ये 25 kWh आणि 35 kWh चे दोन बॅटरी पॅक आहेत, जे अंदाजे 315 किमी आणि 421 किमीची रेंज देतात. लोकांच्या सुरक्षिततेसाठी, या कारमध्ये सहा एअरबॅग्ज, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटरसह 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि ऑटो होल्ड आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आले आहेत. टाटा पंच EV ची एक्स-शोरूम किंमत रु. 10.99 लाख ते रु. 15.49 लाख इतकी आहे.

Citroen eC3 EV

या कारला सुद्धा भारतीयांकडून चांगलीच पसंती दर्शवण्यात आली होती. या कारचे डिझाइन C3 हॅचबॅक सारखेच आहे, परंतु ICE- पॉवर मॉडेलपासून वेगळे करण्यासाठी या कारमध्ये ‘e’ बॅजिंग देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक कार 29.2 kWh बॅटरी पॅकसह येते, जे 57 PS पॉवर आणि 143 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने दावा केला आहे की ही कार 320 किमी पर्यंतची रेंज देते. Citroen eC3 EV ची एक्स-शोरूम किंमत 12.76 लाख ते 13.56 लाख रुपये इतकी आहे.

Tata Tigor EV

स्वस्त इलेकट्रीक कार देण्याच्या बाबतीत टाटा कंपनी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. Tata Tigor EV मध्ये 26 kWh बॅटरी पॅक आहे, जो 75 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करतो. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक कार 315 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे.

Web Title: Here are the 5 cheapest electric cars in india know the range and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 07:29 PM

Topics:  

  • automobile news

संबंधित बातम्या

Tata Sierra चा नवा अंदाज! ‘या’ दिवशी होणार ग्रँड एन्ट्री; पाहा  काय आहेत फिचर्स ?
1

Tata Sierra चा नवा अंदाज! ‘या’ दिवशी होणार ग्रँड एन्ट्री; पाहा काय आहेत फिचर्स ?

18 लाखात Range Rover तर Creta ची किंमत 6 लाख, ‘इथं’ मिळताहेत होलसेलमध्ये उत्तम दर्जाच्या कार
2

18 लाखात Range Rover तर Creta ची किंमत 6 लाख, ‘इथं’ मिळताहेत होलसेलमध्ये उत्तम दर्जाच्या कार

Hyundai चा धमाका! लवकरच येतेय Venue पेक्षाही धाकड कॉम्पॅक्ट SUV; सनरूफ आणि ADAS फिचर्स आणि बरंच काही…
3

Hyundai चा धमाका! लवकरच येतेय Venue पेक्षाही धाकड कॉम्पॅक्ट SUV; सनरूफ आणि ADAS फिचर्स आणि बरंच काही…

गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला जाण्याची कटकट संपली! Maruti ने लाँच केली  ‘QuickStop’ सेवा, एका कॉलवर लोकेशनवर पोहोचणार वॅन
4

गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला जाण्याची कटकट संपली! Maruti ने लाँच केली ‘QuickStop’ सेवा, एका कॉलवर लोकेशनवर पोहोचणार वॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.