Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 लाखात Range Rover तर Creta ची किंमत 6 लाख, ‘इथं’ मिळताहेत होलसेलमध्ये उत्तम दर्जाच्या कार

मार्केटमध्ये आलेली गाडी आलिशान तर असतेच पण त्याचबरोबर त्याच्या किमती या सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. मग लोकांकडे पर्याय राहतो तो अनेकदा जुन्या म्हणजेच सेकंड-हँड गाड्यांकडे वळायचा.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 31, 2026 | 06:30 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लोकांकडे पर्याय राहतो सेकंड-हँड गाड्यांकडे वळायचा
  • कुठे मिळतील सेकंड हँड गाड्या?
  • या लक्झरी कार्स नेमक्या किती परवडणाऱ्या आहेत?
Wholesale Second Hand Market : स्वतःची गाडी असावी, हे प्रत्येकाचंच स्वप्न असते. पण भारतीय बाजारपेठेत नवीन वाहनांच्या किमती या गगनाला भिडणाऱ्या असतात. मार्केटमध्ये आलेली गाडी आलिशान तर असतेच पण त्याचबरोबर त्याच्या किमती या सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. मग लोकांकडे पर्याय राहतो तो अनेकदा जुन्या म्हणजेच सेकंड-हँड गाड्यांकडे वळायचा. पण लोकांमधील आलिशान लक्झरीयस वाहनांविषयी वाढता कल मात्र कमी होत नाही. ही बाब लक्षात घेऊन लोकं अशा ठिकाणांचा शोध घेतात जिथे वाहने परवडणाऱ्या दरात खरेदी करता येईल.जर तुम्हीही एखादी जुनी लक्झरी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही वाहने अत्यंत कमी किमतीत मिळवण्यासाठी नेमके कुठं जायला हवं याची माहिती या आर्टिकलमध्ये देण्यात आली आहे.

Hyundai चा धमाका! लवकरच येतेय Venue पेक्षाही धाकड कॉम्पॅक्ट SUV; सनरूफ आणि ADAS फिचर्स आणि बरंच काही…

कुठे मिळतील सेकंड हँड गाड्या?

दिल्लीमध्ये जुन्या गाड्यांच्या अशा अनेक बाजारपेठा आहेत, जिथे लक्झरी कार्स आणि सुपरबाईक्स अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असतात. अशाच एका ठिकाणाचे नाव आहे ‘करोल बाग’ येथील जुन्या गाड्यांची बाजारपेठ आहे. येथे तुम्हाला हव्या तशा तुमच्या बजेट मधल्या कार उच्च दर्जाच्या लक्झरी कार्स अत्यंत परवडणाऱ्या दरात मिळू शकतात.

या लक्झरी कार्स नेमक्या किती परवडणाऱ्या आहेत?

एका YouTube चॅनेलनुसार, करोल बागच्या जुन्या गाड्यांच्या बाजारात तुम्हाला ‘Mercedes CLA’ ही कार अवघ्या १२ लाख रुपयांना मिळू शकते. याबरोबरच ‘Jaguar F-Pace’ ही कार साधारणपणे २३ लाख रुपयांना खरेदी करता येऊ शकते. तसंच एखादी जुनी ‘Range Rover Evoque’ कार केवळ १८ लाख रुपयांत तुमची होऊ शकते. जर तुम्हाला ‘Ford Endeavour’ खरेदी करण्यात रस असेल, तर तुम्हाला किमान १८ लाख रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, या बाजारपेठेत ‘Hyundai Creta’ ही जुनी कार ६.७५ लाख रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या गाड्या महागड्या खरेदी करायची गरज नाही. इथं तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाड्या तुमच्या परवडणाऱ्या किंमतीत मिळू शकतील.

कुठे मिळतील तुम्हाला गाड्या?

करोल बागच्या बाजारपेठेव्यतिरिक्त, दिल्लीमध्ये जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री होणारी इतर प्रमुख ठिकाणंही आहेत. सरोजिनी नगर, लाजपत नगर, विकास पुरी आणि मोती नगर यांसारख्या जागांवरही तुम्हाला बरेच चांगले चांगले पर्याय मिळू शकतील. जर तुम्ही एखादी जुनी कार खरेदी करण्याचे नियोजन करत असाल, तर काही विशिष्ट बाबींबाबत सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचं आहे. कारण पूर्ण माहिती नसल्यास त्याचा परिणाम म्हणजे तुमची फसवणुक होऊ शकते त्यामुळे या गोष्टींना बळी पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, तुम्हाला काही आवश्यक तपशीलांची सखोल माहिती असणे गरजेचे आहे.

कार खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

जुन्या वाहनाची खरेदी करताना, काही महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. यातील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे वाहनाच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करणं. ‘नोंदणी प्रमाणपत्राच्या’ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीत आणि नियमानुसार असल्याची खात्री करणं गरजेचं आहे त्यासोबतच वाहनाची प्रत्यक्ष स्थिती कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुस्थितीत असल्याची तुम्ही पडताळणी केली पाहिजे. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे; कारण अनेकदा फसवणूक किंवा अनियमिततांना सामोरे जाण्याचा धोका येथे संभवतो. जर तुम्हाला कमी किमतीत एखादे चांगले वाहन खरेदी करायचे असेल, तर खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण माहिती मिळवणे आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे; जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

King Khan ने आपल्या ‘क्वीन’ साठी खरेदी केली Mercedes ची नवी आलिशान वॅन, फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Web Title: Wholesale second hand car market in karol bagh cheap rate of range rover evoque mercedes cars marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Affordable Price
  • automobile news
  • Jaguar Land Rover
  • Mercedes
  • Mercedes car

संबंधित बातम्या

रेल्वे क्षेत्रात क्रांती! जगातील पहिली ‘Hydrogen Narrow-Gauge Train’ झाली सुरू; धूर नाही, प्रदूषण नाही, फक्त पाण्याची वाफ
1

रेल्वे क्षेत्रात क्रांती! जगातील पहिली ‘Hydrogen Narrow-Gauge Train’ झाली सुरू; धूर नाही, प्रदूषण नाही, फक्त पाण्याची वाफ

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद
2

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद

EV vs CNG : इलेक्ट्रिक की CNG कार? 15 वर्षांत कोणती कार वाचवते सर्वाधिक पैसे, अहवालातून मोठा खुलासा
3

EV vs CNG : इलेक्ट्रिक की CNG कार? 15 वर्षांत कोणती कार वाचवते सर्वाधिक पैसे, अहवालातून मोठा खुलासा

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय
4

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.