Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Sierra चा नवा अंदाज! ‘या’ दिवशी होणार ग्रँड एन्ट्री; पाहा काय आहेत फिचर्स ?

रतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत टाटा मोटर्सचे आधीच मजबूत स्थान आहे आणि आता कंपनी आपलं स्थान आणखी मजबूत करण्यासाठी मार्केटमध्ये नवीन Sierra EV उतरवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Tata Sierra EV १९ मे २०२६ रोजी लॉन्च होणार.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 31, 2026 | 07:15 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आणखी मजबूत करण्यासाठी मार्केटमध्ये नवीन Sierra EV
  • कोणत्या कार्सशी करणार स्पर्धा?
  • लुक आणि मॉडर्न डिजाइन
Tata Sierra EV Launch Timeline: भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत टाटा मोटर्सचे आधीच मजबूत स्थान आहे आणि आता कंपनी आपलं स्थान आणखी मजबूत करण्यासाठी मार्केटमध्ये नवीन Sierra EV उतरवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Tata Sierra EV १९ मे २०२६ रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी विशेषतः अशा ग्राहकांना टार्गेट करत आहे ज्यांना एक स्टायलिश आणि वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक SUV हवी आहे. त्यांच्यासाठी ही कार उत्तम पर्याय ठरणार आहे. त्यामुळे मार्केटमधील स्पर्धा आणखीनच वाढणार आहे.

18 लाखात Range Rover तर Creta ची किंमत 6 लाख, ‘इथं’ मिळताहेत होलसेलमध्ये उत्तम दर्जाच्या कार

कोणत्या कार्सशी करणार स्पर्धा?

Tata Sierra EV भारतात Hyundai Creta EV, Maruti E-Vitara, Mahindra BE सीरीज आणि MG Windsor EV यांसारख्या अनेक शक्तिशाली इलेक्ट्रिक SUV या कार्सशी स्पर्धा करणार आहे. Tata ही SUV Curvv EV आणि Harrier EV यांच्या दरम्यानची कार असणार आहे. म्हणजेच ही एक मध्यम-श्रेणीतील प्रीमियम इलेक्ट्रिक SUV कार असणार आहे. यामध्ये सिंगल मोटर तसेच ड्युअल मोटरचा पर्याय दिला जाऊ शकतो, ज्यामुळे तिच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

लुक आणि मॉडर्न डिजाइन

Tata Sierra EV आकर्षक आणि आधुनिक डिझाइनसह मार्केटमध्ये उतरणार आहे. ही गाडी Tata च्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेल्या Acti.ev + प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. यामध्ये क्लोज्ड फ्रंट ग्रिल, रुंद असे LED DRLs आणि स्प्लिट हेडलॅम्प सेटअपने सुसज्ज असणार आहे. फ्लश डोअर हँडल, नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स आणि कनेक्टेड LED टेललाइट्स या गाडीला एक प्रीमियम आणि आकर्षक लूक देतील. ही SUV रस्त्यावर दणकट आणि स्टायलिश दोन्ही दिसेल, त्यामुळे ती तरुण ग्राहकांना आणि कुटुंबाचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी बेस्ट मॉडेल आहे.

फीचर्स आणि प्रीमियम इंटीरियर

Tata Sierra EV चा इंटिरियर प्रीमियम आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल. यात ट्रिपल-स्क्रीन सेटअप असू शकतो, ज्यामुळे त्याला आधुनिक लुक मिळणार आहे. यात वायरलेस चार्जिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ॲम्बियंट लायटिंग, पॉवर सीट्स आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देखील असतील. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ड्रायव्हिंग आरामदायक आणि सुलभ होणार आहे. सुरक्षेसाठी, यात सहा एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल २ ADAS यांसारखी प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. या सगळ्यामुळे ही कार जास्त सुरक्षित ठरणार आहे.

दमदार बॅटरी आणि शानदार रेंज

Tata Sierra EV ५५kWh ते ७०kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळणार आहे. एकदा चार्ज केल्यावर तिची रेंज अंदाजे ६०० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ती लांबच्या प्रवासासाठी एक उत्तम आदर्श ठरु शकते. ती सिंगल आणि ड्युअल मोटर या दोन्ही पर्यायांसह मार्केटमध्ये उतरु शकते. तसेच, यामध्ये V2L म्हणजेच व्हेईकल टू लोड आणि V2V म्हणजेच व्हेईकल टू व्हेईकल सारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील असण्याची शक्यता आहे.

कारची किंमत काय असू शकते?

Tata Sierra EV ची किंमत अंदाजे १५ लाख ते १७ लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या किमतीत, ही SUV एक उत्तम पर्याय ठरू शकते. विशेषतः ज्यांना परवडणाऱ्या किमतीत एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV हवी आहे त्यांच्यासाठी ही कार उत्तम उदाहरण ठरते.

King Khan ने आपल्या ‘क्वीन’ साठी खरेदी केली Mercedes ची नवी आलिशान वॅन, फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Web Title: Tata sierra ev launch date expected on 19 may 2026 check price features rivals and more details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • automobile news
  • Electric Vehicles
  • Marathi News
  • tata sierra

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.