Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये

हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडर+ E85 आणि एचएफ डिलक्स E85 या फ्लेक्स-फ्युएल बाइक्सना भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जून 2026 मधील लाँचनंतर दोन्ही मॉडेल्सच्या मिळून जवळपास 10,000 बुकिंग झाल्या आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 10:00 AM
भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये
Follow Us
Follow Us:
  • हिरोच्या दोन E85 फ्लेक्स-फ्युएल बाइक्सना भारतात मिळून 10,000 बुकिंगचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
  • स्प्लेंडर+ E85 आणि एचएफ डिलक्स E85 या बाइक्स E20 ते E85 इंधनावर चालण्यास सक्षम आहेत.
  • E85 इंधनाची मर्यादित उपलब्धता सध्या या फ्लेक्स-फ्युएल बाइक्सच्या वाढीसाठी प्रमुख अडथळा ठरत आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचा वापर वाढत असताना फ्लेक्स-फ्युएल वाहनांकडेही मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडर+ E85 फ्लेक्स-फ्युएल आणि एचएफ डिलक्स E85 फ्लेक्स-फ्युएल या दोन मोटरसायकलींना मार्केटमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. जून 2026 मध्ये लाँच झाल्यापासून या दोन्ही बाइक्सना मिळून जवळपास 10,000 बुकिंगचा टप्पा गाठला आहे.

हिरो मोटोकॉर्पने देशातील पहिल्या E85 फ्लेक्स-फ्युएल सक्षम मोटरसायकली म्हणून या दोन्ही मॉडेल्सना बाजारात आणले. स्प्लेंडर+ E85 ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ₹82,810, तर एचएफ डिलक्स E85 ची किंमत ₹72,792 ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या मते, बुकिंगसोबतच उपलब्ध होणाऱ्या बाइक्सची विक्रीही होत आहे. त्यामुळे सुरुवातीचा ग्राहक प्रतिसाद चांगला आणि सकारात्मक असल्याचे स्पष्ट होते.

Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक

हिरो मोटोकॉर्पचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा यांनी सांगितले की, कंपनीकडे 10,000 पेक्षा जास्त चौकशा आल्या असून बुकिंगचा आकडा 10,000 जवळ पोहोचला आहे. फ्लेक्स-फ्युएल बाइक्ससाठी उत्पादन क्षमता वाढवण्याचा कंपनीचा मानस असून, भविष्यात हा व्यवसायातील महत्त्वाचा भाग ठरू शकतो.

या बाइक्स E20 ते E85 पर्यंतच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालू शकतात. सध्या भारतात E20 पेट्रोल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असले, तरी E85 इंधनाची उपलब्धता अजून मर्यादित आहे. दिल्ली-NCRसह काही मोजक्या पेट्रोल पंपांवरच E85 मिळते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार होण्यासाठी इंधनाचे नेटवर्क वाढणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स

फ्लेक्स-फ्युएल मॉडेल्समध्ये नवीन फ्युएल पंप, सेकंडरी फ्युएल फिल्टर आणि सुधारित ECU कॅलिब्रेशन करण्यात आले आहे. यामुळे पॉवरमध्ये 7% आणि टॉर्कमध्ये 3% वाढ झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक फ्युल सोबत चांगली कामगिरी देण्याचा प्रयत्न या बाइक्समध्ये करण्यात आला आहे.

Web Title: Hero e85 flex fuel bikes reach 10000 bookings india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती
1

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती

2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स
2

2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स

भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे
3

भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर
4

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.