(फोटो सौजन्य-AI एआय)
नवीन फीचर्स आणि अपग्रेड्स
आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाइक Hunk 440 नावाने विकली जाते. स्पॉट झालेल्या मॉडेलमध्ये जुन्या टेलिस्कोपिक फोर्क्सऐवजी प्रीमियम गोल्ड-फिनिश USD फ्रंट फोर्क्स आणि साध्या LCD स्क्रीनऐवजी आधुनिक TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. या नव्या डिस्प्लेमुळे बाइकमध्ये राइड मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइड-बाय-वायर थ्रॉटल यांसारखे हाय-टेक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
Hero Splendor Off Road Crossover: हिरो स्प्लेंडर आता नव्या ऑफ-रोड रुपात; डिझाइनचे पेटंट भारतात बुक!
इंजिन आणि मेकॅनिकल परफॉर्मन्स
बाइकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये आधीप्रमाणेच ४४०cc सिंगल-सिलिंडर, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन २७ bhp पॉवर आणि ३६ Nm टॉर्क जनरेट करते, ज्याला ६-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे. बाइकमध्ये ड्युअल-चॅनेल ABS सह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स आणि १७-इंच अलॉय व्हील्स मिळतात.
भारतात पुन्हा येण्याची शक्यता धुसर
फेब्रुवारी २०२४ मध्ये लाँच झालेली मॅव्हरिक ४४० भारतात सुमारे १८ महिने विक्रीसाठी उपलब्ध होती. हार्ले-डेव्हिडसन X440 च्या तुलनेत किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीने सुरुवातीला यातून USD फोर्क्स आणि TFT स्क्रीनसारखे प्रीमियम फीचर्स वगळले होते. पण,, ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे कंपनीला ही बाइक भारतात बंद करावी लागली होती. सध्या हीरो मोटोकॉर्प भारतीय बाजारासाठी ‘Xpulse 421’ वर काम करत असल्याने, मॅव्हरिक ४४० चे भारतात पुनरागमन होण्याची शक्यता फारच कमी आहे.






