फोटो सौजन्य: @Wheelsofmotor1 (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’ येत आहेत. याचे कारण म्हणजे ग्राहक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. यामुळेच इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीत सुद्धा चांगली वाढ होतेय. देशात अनेक अशा उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक ऑफर करत आहे. विशेष म्हणजे यांची रेंज सुद्धा 100 किमीपेक्षा जास्त आहे.
हिरो मोटोकॉर्प सुद्धा देशात इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत आहे, ज्याला ग्राहकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. यामुळेच तर जुलै 2025 मध्ये, कंपनीने एका महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विक्री नोंदवली आहे. सरकारच्या वाहन वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, कंपनीने 10,489 Vida स्कूटर विकल्या आहेत. 2022 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी स्कूटर बाजारात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने 10000 युनिट मासिक विक्रीचा आकडा ओलांडला आहे.
आता बास झाली पेट्रोलची कटकट ! फक्त 8 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल ‘ही’ Tata EV
जुलै 2025 मध्ये Vida ची विक्री, जी वार्षिक 107 टक्क्यांनी वाढली आहे (जुलै 2024: 5,067 युनिट्स), कंपनीने मार्च 2025 मध्ये 8,040 युनिट्सच्या विक्रीला सहजपणे मागे टाकली. यामुळे हिरो मोटोकॉर्पला गेल्या महिन्यात किरकोळ विक्री झालेल्या 1.02 लाख इलेक्ट्रिक दुचाकींपैकी पहिल्यांदाच 10 टक्के मासिक मार्केट शेअर मिळविण्यास मदत झाली आहे.
शिवाय, 2025 हे वर्ष हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेसाठी एक विक्रमी वर्ष ठरत आहे. या वर्षी जानेवारीमध्ये विकल्या गेलेल्या 1,626 युनिट्सवरून जुलैमध्ये 10,489 युनिट्सपर्यंत, जे गेल्या सात महिन्यांत 545 टक्के वाढ दर्शवते, हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ दिसून येत आहे. गेल्या महिन्यात Vida च्या विक्रीत वाढ होण्याचे कारण म्हणजे Vida VX2 लाँच करणे, ज्याची किंमत खूपच कमी आहे.
नव्या रूपात Volvo XC60 Facelift लाँच, यंदा प्रवाशांच्या सेफ्टीवर जास्त लक्ष
हिरोने 2 जुलै रोजी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Vida लाँच केली. कंपनीने त्याचे नाव Vida VX2 असे ठेवले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 142 किमी पर्यंत चालेल. यामध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे ती बॅटरी रेंटल प्रोग्राम ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ (BAAS) सह सादर केली गेले आहे.
त्याची सुरुवातीची किंमत 99,490 रुपये आहे. त्याच वेळी, बीएएएस प्रोग्रामसह त्याची सुरुवातीची किंमत फक्त 59,490 रुपये आहे. यात बॅटरीची किंमत समाविष्ट नाही. मात्र, कंपनीने 7 दिवसांत त्याची किंमत 15 हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यानंतर आता त्याची किंमत 44,490 रुपये झाली.